लता दीदींच्या आठवणीत झी मराठीवर विशेष कार्यक्रम

झी मराठीकडून येत्या रविवारी सुरेल पर्वाला आदरांजली

लता दीदींचं रसिक प्रेक्षकांच्या मनात असलेलं स्थान कोणीच घेऊ शकत नाही. त्यांच्या निधनामुळे संगीत व सांस्कृतिक विश्वावर शोककळा पसरली आहे. लतादीदी लौकिकार्थानं आपल्यातून निघून गेल्या असल्या तरी सुरांच्या रूपानं त्यांच्या स्मृती चिरंतन राहतील. त्यांच्या गोड आणि सुरेल आठवणींना उजाळा देण्यासाठी तसेच लता दीदींच्या सुरेल पर्वाला आदरांजली देण्यासाठी झी मराठी एक खास कार्यक्रम रविवारी १३ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता सादर करणार आहे. २ तासांच्या या विशेष कार्यक्रमातून लता दीदींच्या उपस्थितीतील काही खास क्षण पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळतील. त्यांचा सुरेल आवाज पुन्हा एकदा सगळ्यांना मंत्रमुग्ध करेल. त्यांच्या या आठवणींना उजाळा देत हा विशेष कार्यक्रम प्रेक्षकांची संध्याकाळ अविस्मरणीय करेल.
त्यामुळे पुन्हा एकदा लता दीदींच्या आठवणीत रमण्यासाठी पाहायला विसरू नका हा विशेष कार्यक्रम रविवार १३ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता फक्त आपल्या झी मराठीवर

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..