बेव्हरली हिल्स ऑफ मुंबई, ओशिवरा

लिजेंड सिरोयाकडून बेव्हरली हिल्स ऑफ मुंबई, ओशिवरा येथे लेव्हलवर स्काय रेसिडेन्सेसचे अनावरण
जीवन समृद्ध करणारा आणि परिसर विकसित करणारा हा प्रकल्प मॅक्सिमम सिटीत उत्तम जगण्याचे एक प्रतीक आहे
मुंबई, ९ फेब्रुवारी २०२२: लिजेंड सिरोया या मुंबईतील आघाडीच्या रियल इस्टेट डेव्हलपरने आज बहुप्रतीक्षित स्काय रेसिडेन्सेसच्या अनावरणाची घोषणा केली. स्काय हा ओशिवरा येथील लेव्हल- दि रेसिडेन्सेसचा दुसरा टप्पा आहे. स्काय रेसिडेन्सेस ही अत्यंत वरच्या मजल्यावरील घरे असून येथे व्यापक डेक क्षेत्रे आणि खासगी घरगुती कार्यालये आहेत. येथे १, २ आणि ३ बीएचके घरे असून त्यात एका सर्वांगीण, आनंदी आणि समृद्ध आयुष्यासाठी आवश्यक असलेल्या १८ जीवनशैली सुविधा आहेत.
हा ३५ निवासी मजल्यांसह असलेला एकल टॉवर दोन विशेष पेमेंट योजना देतो. त्यात एक १०:९० पेमेंट योजना आणि एक कस्टमाइज्ड लवचिक पेमेंट योजना आहे, ज्यातून ग्राहकांचा पेमेंटचा ताण कमी होतो आणि त्यांना आपल्या आयुष्यातील पुढील टप्पा आपल्या वेगाने सुरू करण्याची संधी मिळते. सर्व ग्राहक आणि बजेट्ससाठी सुयोग्य असलेली विविध ऑफरिंग्स देणाऱ्या या प्रकल्पात खालील गोष्टी आहेत:
१ बीएचके सिग्नेचर (बाल्कनीसह) – १.३५ कोटी रूपयांपासून ४७० चौ. फूट.
२ बीएचके सिग्नेचर (बाल्कनीसह) - ७०३ चौ. फूट १.९५ कोटीं रूपयांपासून पुढे
३ बीएचके ग्रँड (बाल्कनी आणि होम ऑफिससह) २.९५ कोटी रूपयांपासून पुढे
न्यू लिंक रोड, ओशिवरा येथे स्थित हा प्रकल्प तुमचा गेटवे टू लोखंडवाला आहे. तो पश्चिम द्रुतगती महामार्गापासून सहज जाण्यासारखा आहे आणि तो तुम्हाला विमानतळ, बीकेसी व दक्षिण मुंबईशी सहजपणे जोडतो. या प्रकल्पाच्या आसपासच्या परिसरात उत्तम दर्जाच्या मनोरंजन सुविधा, जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संस्था आणि अद्ययावत वैद्यकीय सुविधा अशा प्रकारच्या नागरी सुविधा आहेत. त्यामुळे तो आधुनिक जीवनातील आयुष्याच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी अत्यंत सुयोग्य ठरला आहे.
या प्रकल्पाची प्रमुख वैशिष्टे त्याचे स्थान, डिझाइन आणि विविध प्रकारच्या सुविधा आहेत. त्यात पूर्णपणे सुसज्ज हेल्थ क्लब, बँक्वेट हॉल, स्काय लाऊंज, स्काय जॉगिंग ट्रॅक, स्काय योगा सेंटर, प्रायव्हेट थिएटर, ग्रँड डबल हाइट लॉबी, स्विमिंग पूल, मुलांच्या खेळण्याची जागा, लँडस्केप्ड हरित पोडियम गार्डन, हाय स्पीड एलिव्हेटर्स आणि अत्यंत सुंदर ३६० अंशातील काचेची इमारत आहे. यातील इतर विशेष वैशिष्ट्यांमध्ये अत्यंत दिमाखदार डेक क्षेत्रे, अत्यावश्यक होम ऑफिसेस, पूर्णपणे ऑटोमेटेड पार्किंग टॉवर्स २४x७ वॅले सेवा आणि कॉन्सिएर्ज डेस्क या गोष्टी आहेत.
या प्रकल्पाच्या अनावरणाबाबत आणि आलिशान घरांच्या ग्राहकांच्या वाढत्या प्राधान्याबाबत बोलताना लिजेंड सिरोयाचे संस्थापक भागीदार ऋषभ सिरोया म्हणाले की, “फेज १ ला मिळालेल्या यशानंतर आम्हाला लेव्हल स्काय रेसिडेन्सेसच्या दुसऱ्या टप्प्याचे अनावरण करताना खूप आनंद होत आहे. ही घरे मोठ्या बाल्कनींसह आणि खासगी होम ऑफिसेससह आहेत. अपार्टमेंटची रचना आणि आधुनिक डिझाइन तसेच सोयीचे स्थान यांच्यामुळे हा प्रकल्प गुंतवणुकीचा उत्तम पर्याय ठरला आहे. हा प्रकल्प आपली जीवनशैली सुधारण्यासाठी तसेच आपल्या कुटुंबासाठी दीर्घकालीन मालमत्ता तयार करणाऱ्या प्रयत्नशील असलेल्या नेक्सजेनसाठी आदर्श आहे. लेव्हलमधील गँट्रीची पातळी व्यावसायिक कुटुंबे, व्यावसायिक, बॉलीवूड सेलिब्रिटी यांचे एकत्रिकरण असलेली आहे आणि त्यामुळे लेव्हलच्या प्रत्येक रहिवाशासाठी हे स्टेटस सिम्बॉल आहे.''

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight

Racks & Rollers..