ईकॉम एक्सप्रेसने आशिष सिक्का यांची मुख्य धोरण अधिकारी म्हणून नियुक्ती केली
ई-कॉमर्स उद्योगाला भारतातील आघाडीचे तंत्रज्ञान-सक्षम एंड-टू-एंड लॉजिस्टिक सोल्यूशन्स पुरवठादारांपैकी एक असलेल्या ईकॉम एक्सप्रेस लिमिटेड ने आशिष सिक्का यांची मुख्य धोरण अधिकारी म्हणून नियुक्ती जाहीर केली. ते प्रमुख कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक टी .ए .कृष्णन यांना अहवाल देतील आणि ईकॉम एक्सप्रेस नेतृत्व संघाचा भाग असतील.
या भूमिकेत, आशिष कंपनीचे धोरणात्मक नियोजन, कॉर्पोरेट विकास, मर्जर अँड अक्विजीशन आणि भागीदारी, कंपनीच्या सर्व व्यवसाय मार्गांमध्ये वाढ आणि परिवर्तनाच्या पुढाकारासाठी जबाबदार असतील, कारण कंपनी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, ऑटोमेशन आणि डेटा ॲनालिटिक्स द्वारे समर्थित व्यवसाय परिणामांना चालना देणार्या नवीन वाढीच्या टप्प्यावर आहे. या नियुक्तीवर भाष्य करताना, ईकॉम एक्सप्रेस लिमिटेडचे प्रमुख कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक टी.ए. कृष्णन म्हणाले, ‘‘एक कुशल परिवर्तनवादी नेताआणि रणनीतिकार म्हणून आशिषची पार्श्वभूमी आमच्या नेतृत्व संघात एक शक्तिशाली जोड आहे. त्यांच्या अनुभवाने आणि कौशल्याने, आशिष आमच्या धोरणात्मक नियोजन आणि प्रयत्नांना चालना देतील कारण आम्ही आमचे स्पर्धात्मक फायदे आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा फायदा घेत आहोत. मला विश्वास आहे की ते आम्हाला बाजारातील बदलांचा अंदाज आणि अर्थ लावण्यासाठी, दीर्घकालीन वाढीच्या संधी ओळखण्यात आणि आमच्या ग्राहक तसेच गुंतवणूकदारांसाठी मूल्य वाढविण्यात मदत करतील.'
Comments
Post a Comment