आरव अनमॅन्ड सिस्टम् (AUS)
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने ड्रोनच्या आयातीवर तात्काळ बंदी घालण्याची घोषणा केली आहे. या निर्णयावर आरव अनमॅन्ड सिस्टम् (AUS) चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.विपुल सिंग यांची प्रतिक्रिया:
श्रीविपुल सिंग म्हणतात की, "भारताच्या ड्रोन इकोसिस्टमसाठी ही अतिशय उत्साहवर्धक बातमी आहे. देशभरात सामाजिकदृष्ट्या अनेक ठिकाणी प्रभावी वापर करणे गरजेचे असताना, आम्ही किती काळ उधार घेतलेल्या तंत्रज्ञानावर आणि कौशल्यावर अवलंबून राहू शकतो? भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी या आयात बंदीकडे आम्ही एक उत्तम संधी म्हणून पाहतो आणि नजीकच्या भविष्यात भारताकडे ड्रोन तंत्रज्ञानाचा एक मोठा निर्यातदार बनण्याची मोठी क्षमता आहे. आम्ही निश्चितपणे भारतात तंत्रज्ञान निर्मिती अधिक सक्षम करण्याच्या आणि खरोखर मेक इन इंडिया होण्याच्या मार्गावर आहोत.”
Comments
Post a Comment