फ्युचर जनराली इंडिया इन्श्युरन्स
फ्युचर जनराली इंडिया इन्श्युरन्सने मुंबई महानगरपालिकेला मानसिक आरोग्याच्या संदेशांसह 8500 मास्क दान केले
11 फेब्रुवारी, 2022 : मानसिक आरोग्याबद्दलच्या चर्चांमधील अवघडलेपण काढून टाकत त्या सामान्य करण्यावर भर देत आणि मानसिक व शारीरिक कल्याणाच्या सुरक्षेला महत्त्व देण्याबाबत जागरुकता निर्माण करत, फ्युचर जनराली इंडिया इन्श्युरन्स कंपनी लिमिटेड मुंबई महानगरपालिकेला 8500 मास्क दान करत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे या मास्कचा उपयोग करून घेण्यात येणार आहे आणि हे मास्क डॉक्टर, प्रत्यक्ष काम करणारे कर्मचारी, संस्थात्मक विलगीकरण कर्मचारी, विमानतळ व रेल्वे स्थानकांवरील कर्मचारी यांना वितरित करण्यात येणार आहेत. प्रत्येक मास्कवर मानसिक आरोग्याला प्रतिबंध करण्याबाबतचा संदेश असेल, त्याचप्रमाणे मानसिक आजार असलेल्या व्यक्तींना आपल्या आजाराबद्दल मोकळेपणी बोलण्याबद्दल प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
शहर स्वच्छ आणि राहण्याजोगे ठेवण्यासाठी मुंबई महानगरपालिका कायम आघाडीवर राहिली आहे आणि शहराचे रक्षण केले आहे. त्याचप्रमाणे साथीच्या रोगाच्या काळात आरोग्य पायाभूत सुविधांचे नियोजन करण्यात मुंबई महानगरपालिकेने उत्प्रेरकाची भूमिका बजावली आहे. या परिस्थितीत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना कोव्हिड-19, तसेच मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे अशा प्रकारच्या उपक्रमातून त्यांना सहकार्य करणे यथोचित आहे.
फ्युचर जनराली इंडिया इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडच्या चीफ मार्केटिंग ऑफिसर रुचिका वर्मा म्हणाल्या, “एक जबाबदार विमाकर्ता आणि उद्दिष्ट घेऊन चालणारा ब्रँड म्हणून मानसिक आरोग्याच्या बाबतीत आपल्या नागरिकांना माहिती देण्यासाठी आणि जागरुकता निर्माण करण्यासाठी विचारांना प्रवृत्त करणारी अभियाने राबविण्यात आम्ही आघाडीवर राहिलो आहोत.”
गेल्या दोन वर्षांपासून आपल्या आघाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी स्वतःचे आरोग्य पणाला लावून सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या देणगीच्या माध्यमातून, आम्हाला मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या शारीरिक सुरक्षेसाठी पुरेसे संरक्षण प्रदान करून सहकार्य करायचे आहे आणि मानसिक आरोग्याबद्दल जागरुकताही निर्माण करायची आहे. या साथीच्या रोगाने आपल्याला एक गोष्ट निश्चितच शिकवली आहे, ती म्हणजे सहानुभूती दर्शविणे आणि जे आपल्या परिसरातील लोकांना सहकार्य करा.”
Comments
Post a Comment