सोयरीक’ या चित्रपटाचा शानदार प्रीमियर सोहळा संपन्न

सोयरीक’ चित्रपटाचा शानदार प्रीमियर

चित्रपटाच्या घोषणे पासून उत्सुकता निर्माण करणाऱ्या सोयरीक या चित्रपटाचा शानदार प्रीमियर सोहळा नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. चित्रपटातील कलाकारांसोबतच मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांनी या प्रिमियर सोहळ्याला हजेरी लावली. नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’ आणि बहुरूपी प्रोडक्शन्स’ यांची निर्मिती असलेल्या सोयरीक चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन मकरंद माने यांनी केले आहे. विजय शिंदेशशांक शेंडेमकरंद माने या  चित्रपटाचे निर्माते आहेत.

महत्त्वाचा विषय आणि त्यातील मानसिक संघर्ष शेवटपर्यंत उत्तम पद्धतीने मांडला असल्याच्या प्रतिक्रिया उपस्थितीत मान्यवरांनी यावेळी दिल्या. ही सोयरीक मनाला अंत:र्मुख करणारी आहे अशा शब्दात उपस्थितीत मान्यवरांनी चित्रपटाचे कौतुक  केले आहे.

सोयरीक’ किंवा लग्न जुळवणे’ ही कुटुंब प्रवाहाला वळण देणारी घटना असते. लग्नाविषयीत्यापेक्षाही सहजीवनाविषयी आजची तरुणाई जास्त प्रॅक्टिकली विचार करतेय. पणया व्यावहारिकतेमध्ये व्यक्तिस्वातंत्र्य किती जपलं जातंयएकमेकांच्या अपेक्षांचाव्यक्तिस्वातंत्र्याचा आदर करण्याएवढी परिपक्वता खरंच आली आहे काहे प्रभावीपणे दाखवून देणारा हा चित्रपट आहे.

सोयरीक’ चित्रपटात शशांक शेंडेकिशोर कदमछाया कदमउमेश जगतापराजश्री निकमशंतनू गंगणेविराट मडकेप्रियदर्शनी इंदलकरविनम्र भाबलनिता शेंडेयोगेश निकमअतुल कासवासंजीवकुमार पाटीलअपर्णा क्षेमकल्याणी  आदि कलाकारांच्या भूमिका आहेत.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight

Racks & Rollers..