अभिनेता रमेश देव यांच्या आठवणी 'हे तर काहीच नाय'मध्ये

जेष्ठ अभिनेते रमेश देव यांनी काही दिवसांपूर्वीच मराठी मनोरंजनसृष्टीला पोरकं केलं. एक उत्तम अभिनेता, एक चांगला माणूस आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना रमेश देव यांच्या चाहत्यांमध्ये पसरली आहे. त्यांच्या निधनानं एक पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या आठवणी या नेहमीच सर्व रसिक-प्रेक्षकांसोबत राहतील, पण त्यांच्या अभिनय कारकिर्दीतील काही आठवणी रमेश देव यांनी झी मराठवरील हे तर काहीच नाय या कार्यक्रमात शेअर केल्या. काही आठवड्यापूर्वीच अभिनेता रमेश देव यांनी हे तर काहीच नाय या कार्यक्रमाच्या मंचावर हजेरी लावली होती. त्यांच्या उपस्थितीने सगळेच कलाकार भारावून गेले होते. रमेशजींनी त्यांचा आणि बच्चनजींचा एका किस्सा शेअर केला. त्यांचे किस्से ऐकून सगळ्या उपस्थित कलाकारांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. वयाच्या ९४व्या वर्षी देखील रमेशजींचा असलेला उत्साह आपल्या सगळ्यांना खूप काही शिकवून जातो. त्यांच्या या काही गोड आठवणी त्यांच्याचकडून ऐकण्याची पर्वणी प्रेक्षकांना मिळणार आहे. प्रेक्षक आगामी भागात आपल्या या आवडत्या कलाकाराच्या आठवणींचा आनंद घेऊ शकतात. त्यामुळे पाहायला विसरू नका हे तर काहीच नाय शुक्रवार आणि शनिवार रात्री ९.३० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.  

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

BlueStone Jewellery & Lifestyle IPO

Cityflo & Salaam Bombay Foundation