झी टॉकीजवर ‘प्रत्येक रविवार चित्रपट धमाकेदार’
झी टॉकीजवर ‘प्रत्येक रविवार चित्रपट धमाकेदार’
खमंग जेवणासोबत धमाल मनोरंजनाची जोड मिळाली तर आपला रविवार खऱ्या अर्थाने सार्थकी लागतो. येत्या जून व जुलै महिन्यातील रविवार प्रेक्षकांसाठी अजून खास करण्यासाठी झी टॉकीज वाहिनीने वेगवेगळ्या धाटणीच्या मनोरंजक चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांसाठी आणली आहे. ‘प्रत्येक रविवार चित्रपट धमाकेदार’ या संकल्पनेतंर्गत वेगवेगळया चित्रपटांचा नजराणा झी टॉकीजवर प्रेक्षकांना घरबसल्या घेता येणार आहे. चित्रपटांसोबत ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ ह.भ.प इंदुरीकर महाराज विशेष, ‘झी टॉकीज ओरिजिनल चित्रपट’ असा मनोरंजनाच्या विविध खजिन्याचा समावेश यात असणार आहे.
येत्या रविवारी ५ जूनला ब्लॉकबास्टर ‘लोच्या झाला रे’ या चित्रपटाची मेजवानी वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर मधून दुपारी १२. ०० वा. व सायं. ६.०० वा. घेता येणार आहे. अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, वैदेही परशुरामी आणि सयाजी शिंदे यांच्या अभिनयाचा 'कल्ला' असणारा हा धमाल विनोदी चित्रपट प्रेक्षकांसाठी रविवार साठी ‘फुल्ल टू मेजवानी’ असणार आहे.
प्रेक्षकांच्या शंभरटक्के मनोरंजनासाठी संपूर्ण जून व जुलै महिन्यामध्ये दररोज एक सुपरहिट चित्रपट तसेच नाचू कीर्तनाचे रंगी ह.भ.प इंदुरीकर महाराज विशेष भाग झी टॉकीज वाहिनी'वर प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत. यात ‘इर्सल’,‘माझा अगडबम’, ‘विनाकारण राजकारण’ आणि ‘झोंबिवली’ सारख्या दर्जेदार चित्रपटांचा समावेश आहे.
झी टॉकीज वाहिनीने प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा विचार केला आहे. प्रेक्षकांचा प्रत्येक रविवार ख़ास व्हावा व घरबसल्या त्यांना एका पेक्षा एक सरस चित्रपटांच्या मेजवानीचा निखळ आनंद मिळावा, यासाठी ‘प्रत्येक रविवार चित्रपट धमाकेदार’ घेऊन आल्याचे झीच्या मराठी मुव्ही क्लस्टरचे चीफ चॅनेल ऑफिसर श्री. बवेश जानवलेकर यांनी सांगितले.
Comments
Post a Comment