"मीडियम स्पाइसी" मध्ये दिसणार स्पृहा जोशी

तगडी स्टारकास्ट असलेल्या "मीडियम स्पाइसीमध्ये दिसणार स्पृहा जोशी

"मीडियम स्पाइसीचित्रपटाच्या ट्रेलर मधून जेष्ठ अभिनेत्री अरुंधती नाग बऱ्याच काळाने मराठी चित्रपटात दिसणार असल्याचे स्पष्ट झाले होते आणि आता चित्रपटाच्या टीमने सोशल मीडियावर जाहीर केल्याप्रमाणे स्पृहा जोशीच्या अभिनयाचा फ्लेवर रसिकांना या चित्रपटातून अनुभवता येणार आहेआशयघन चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी नव्या पिढीतील एक हरहुन्नरी कलाकार म्हणजे स्पृहा जोशीचित्रपटरंगभूमी आणि टेलिव्हिजनवर लीलया वावरणारी आणि अभिनयाबरोबरच लेखनसूत्रसंचालनकविता या माध्यमातून रसिकांचे मनोरंजन करणारी स्पृहा "मीडियम स्पाइसी"मध्ये कृष्णा नावाच्या एका छोट्याशा पण वैशिष्ट्यपूर्ण भूमिकेत दिसणार आहेकृष्णा नक्की कोण आहेयाचा अजून खुलासा झालेला नसला तरी जेवणाच्या थाळीत विविध फ्लेवर्स असल्यावर जसे जेवण परिपूर्ण होते तसेच स्पृहा जोशीच्या कृष्णा या पात्राच्या फ्लेवरमुळे "मीडियम स्पाइसीचित्रपटातील पात्रांच्या विविध फ्लेवर्सने सजलेली लज्जतदार थाळी परिपूर्ण होणार आहे.

लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुतविधि कासलीवाल निर्मितइरावती कर्णिक लिखित आणि मोहित टाकळकर दिग्दर्शित आणि ललित प्रभाकरसई ताम्हणकरपर्ण पेठेसागर देशमुखनेहा जोशीपुष्कराज चिरपुटकरइप्शिता या तरुण कलाकारांसह ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णीअरुंधती नाग आणि अभिनेते रवींद्र मंकणी यांच्या सहज सुंदर अभिनयाने सजलेलया "मीडियम स्पाइसीची लज्जतदार डिश १७ जून २०२२ पासून संपूर्ण महाराष्ट्रात रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

The Federation of Obstetric & Gynaecological Societies of India..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight