500 हून अधिक मुंबईतील तरुण जीवनरक्षक म्हणून नोंदणी करण्यासाठी पुढे आले 

डीकेएमएस बीएमएसटी फाउंडेशन इंडिया तर्फे नोंदणी मोहिमेचे आयोजन

 

मुंबई, 29 जुलै 2022: ब्लड स्टेम सेल दानाबद्दल जागरुकता निर्माण करणे आणि ब्लड कॅन्सर आणि ब्लड डिसऑर्डर रूग्णांसाठी संभाव्य जीवनरक्षक म्हणून लोकांना नोंदणी करण्यास प्रोत्साहित करणे या उद्देशाने डीकेएमएस बीएमएसटी फाउंडेशन इंडिया या रक्त कर्करोग आणि रक्त विकारांविरुद्धच्या लढ्यासाठी समर्पित ना-नफा संस्थेने मुंबईतील पाच वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये आठवडाभर ब्लड स्टेम सेल दात्याची नोंदणी मोहीम राबवली. एसके सोमय्या कॉलेज, विद्याविहार विद्यापीठ, जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटीचे विल्सन कॉलेज (स्वायत्त) एनएसएस युनिट, रामनारायण रुईया ऑटोनॉमस कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज आणि सेंट अँड्र्यूज कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स मधील 500 हून अधिक विद्यार्थी संभाव्य ब्लड स्टेम सेल दाता म्हणून नोंदणी करण्यासाठी पुढे आले. यांमध्ये काही एनसीसी आणि एनएसएस विद्यार्थ्यांचाही समावेश होता ज्यांनी संभाव्य जीवनरक्षक म्हणून नोंदणी केली होती.

 

दर 5 मिनिटांनी भारतातील एखाद्याला रक्त कर्करोगथॅलेसेमिया किंवा ऍप्लास्टिक ॲनिमिया झाल्याचे निदान झाल्याची धक्कादायक बातमी मिळतेएका मॅचिंग दात्याकडून स्टेम सेल प्रत्यारोपण ही बहुतेकदा या रूग्णांसाठी जगण्याची एकमेव संधी असतेमॅचिंग ब्लड स्टेम सेल दात्याच्या अनुपलब्धतेमुळे बहुतेक रुग्णांना स्टे सेल प्रत्यारोपण मिळू शकत नाहीसंभाव्य रक्त स्टेम सेल दाता म्हणून नोंदणी करणारे खूप कमी आहेतज्यामुळे रुग्ण व्यक्तीशी जुळणारा दाता शोधणे अधिक कठी होतेयामुळे भारतीय समाजातील अधिकाधिक लोकांनी स्वत:ची नोंदणी करण्याची आणि जीव वाचवण्यासाठी मदत करण्याची आवश्यकता आहे.

 

डीकेएमएस बीएमएसटी फाउंडेशन इंडिया चे सीईओ पॅट्रिक पॉल म्हणाले कि, "एका यशस्वी रक्त स्टेम सेल प्रत्यारोपणासाठी संपूर्ण एचएलए (मानवी ल्युकोसाइट प्रतिजन) टिश्यू जुळणे आवश्यक आहे. 25,000 हून अधिक एचएलए गुणधर्म आहेत (अधिक शोध सुरु आहे), जे लाखो संयोजनांमध्ये अस्तित्वात आहेत. भारतीय वंशाचे रूग्ण आणि दात्यांची विशिष्ट एचएलए वैशिष्ट्ये आहेत जी जागतिक डेटाबेसमध्ये गंभीरपणे कमी प्रतिनिधित्व करतात, ज्यामुळे योग्य दाता शोधण्याची शक्यता अधिक कठीण होते. भारत हा एक तरुण देश असल्याने विद्यार्थ्यांद्वारे रक्त स्टेम सेल दानाबद्दल जास्तीत जास्त जनजागृती करण्याचे आमचे ध्येय आहे. आमच्या मोहिमेत आम्हाला पाठिंबा देणाऱ्या, समाजाच्या भल्यासाठी स्वयंस्फूर्तीने काम करणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांचे आम्ही आभारी आहोत. आम्ही 18-50 वयोगटातील निरोगी व्यक्तींना संभाव्य देणगीदार म्हणून नोंदणी करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी अनेक नोंदणी कार्यक्रम आयोजित करतो."

 

या अभियानामध्ये सहभागी झालेल्या एका विद्यार्थ्याने सांगितले, “मला अभिमान आहे की मला कोणाचा तरी जीव वाचवण्याची संधी मिळाली आहे. फाउंडेशनच्या या उदात्त कामामुळे मला पुढे येण्यासाठी आणि संभाव्य स्टेम सेल दाता म्हणून नोंदणी करण्यासाठी एक व्यासपीठ मिळाले. ही प्रक्रिया अगदी सोपी होती ज्यामध्ये तुम्हाला फक्त तुमच्या गालाच्या स्वाबचा नमुना द्यावा लागतो आणि संमती फॉर्मवर स्वाक्षरी करावी लागते. मी सर्व नागरिकांना आणि विशेषत: तरुणांना आवाहन करतो की, जेव्हा कोविड-19 ने आपल्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या मार्गाने परिणाम केला आहे अशा वेळी ज्यांना मुख्यत्वेकरून आमच्या तातडीच्या मदतीची गरज आहे त्यांना मदत करावी."

एचएलए साठी डोनर स्वॅबचे नमुने विश्लेषित केले जातात आणि हा डेटा गरजू रुग्णांच्या जागतिक शोधासाठी उपलब्ध आहेएखादा दाता मॅच म्हणून आला कीत्यांना ब्लड प्लेटलेट डोनेशन सारख्या प्रक्रियेद्वारे त्यांच्या ब्लड स्टे पेशी दान करण्यास सांगितले जाते.

 

भारतामध्ये रक्त कर्करोगाचे अनेक रुग्ण मुले आणि तरुण आहेत ज्यांच्या बरे होण्याची एकमेव संधी स्टेम सेल प्रत्यारोपण आहे. केवळ 30% रुग्ण ज्यांना जीवनरक्षक उपचार म्हणून स्टेम सेल प्रत्यारोपणाची आवश्यकता असते त्यांनाच एखाद्या भावंडाचा मॅच मिळतो. उर्वरित 70% एका मॅच असणाऱ्या असंबंधित डोनरला शोधण्यावर निर्भर असतात. त्यामुळे ब्लड स्टेम सेल नोंदणी आणि रक्तदानाबद्दल लोकांमध्ये सतत जागरुकता वाढवण्याची गरज आहे जेणेकरून लोक पुढाकार घेऊन स्वतःची नोंदणी करतील. वेळोवेळी, डीकेएमएस बीएमएसटी फाउंडेशन इंडिया नोंदणीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि जागरुकता पसरवण्यासाठी रुग्ण-दात्यांसाठी मोहीम राबवत असते.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

Racks & Rollers..