‘कन्याकुमारी' गाण्यामधली कन्या?

कोण आहे ‘कन्याकुमारी' गाण्यामधली कन्या?

बोलके डोळे, गोरा रंग, नखरेल अदा आणि पारंंपारिक नऊवारी साडीतली नवरी सध्या सगळ्यांच्या मनात भरली आहे.  नवरीच्या  मनातील भावना सांगणारं कन्याकुमारी हे गाणं सध्या सोशल मिडीयावर चांगलंच गाजते आहे. आणि या लग्नाळू गाण्यातील नवरी दिशा परदेशी आहे तरी कोण . आत्तापर्यंत अनेक मॉडेल्स म्युझिक अल्बममधून झळकल्या आहेत. पण मराठमोळी मॉडेल दिशा परदेशी आता कन्याकुमारी बनून समोर आली आहे. दिशाचा कन्याकुमारी हा पहिलाच म्युझिक अल्बम सध्या चांगलाच गाजत आहे.   

सौंदर्य, अभिनय, नृत्य अशी सर्वगुणसंपन्न अशा दिशाने आत्तापर्यंत विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. तब्बल १० वर्षे दिशाने मॉडेलिंग क्षेत्र गाजवलं. अनेक नामांकित डिझाईनर्सकडे मॉडेलिंग, मोठ्या ब्रँड्ससाठी जाहिराती तिने केल्या आहेतच. त्याचप्रमाणे दिशा मिस महाराष्ट्र स्पर्धेची विजेतीही आहे. बुगी वुगी, एका पेक्षा एक या रिएलिटी शोमध्येही सहभाग घेतला होता. दिशा सध्या स्वाभिमान या मालिकेत निहारीकाच्या भूमिकेत दिसून येत आहे. निहारीकानेही वेगळा फॅन क्लब मिळवला आहे. मॉडेलिंग, अभिनयासोबत दिशा चांगली डान्सरही आहे, कथ्थकमध्ये दिशाने प्राविण्य मिळवलं आहे.

दिशा परदेशीने आत्तापर्यंत प्रत्येक कामासाठी मेहनत घेतलीच आहे, तशीच ती कन्याकुमारी या गाण्यासाठीही केली आहे. अतिशय सुंदर चाल असलेल्या या गाण्यासाठी उत्तम टीम लाभली आहे. हे गाणं गायलं आहे गोड गळ्याची गायिका वैशाली सामंत हिने, याचं संगीत दिले आहे चिनार-महेशने. फुलवा खामकरने याची कोरिओग्राफी केली आहे.

या गाण्याबद्दल दिशा सांगते,”या गाण्यासाठी माझी निवड अचानक झाली. त्यामुळे गाण्याचा सराव आणि शूटिंग एकत्रच करावं लागलं. व्हिडीओ पॅलेसचा अल्बम आणि एवढी चांगली टीम त्यामुळे शूटिंगला खूप मजा आली. कन्याकुमारी हे गाणं ऐकल्यावरंच थिरकायला लावणारं गाणं आहे. फॅन्सने तर याचे रिल्स करुन सोशल मिडीयावर अपलोड केले आहेत. या गायाला मिळालेल्या प्रतिसादामुळे मी खूप खूष आहे."

दिशाला वेगवेगळ्या माध्यमांचा अनुभव घ्यायचा आहे. या बदद्ल दिशा सांगते, गेल्या दहा वर्षात मी विविध चॅलेंजेस स्वीकारले आहेत.
त्यामुळेच मी मॉ़डेलिंग, रिएलिटी शोज, जाहिराती, मालिका यात काम करु शकले. यापुढेही मला सिनेमा, ओटीटी अश्या सर्व माध्यमात स्वतःला सिद्ध करायचं आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..