अपोलो - आयएमए वैज्ञानिक सत्राचे आयोजन

प्रौढांच्या लसीकरण संदर्भात अपोलो - आयएमए वैज्ञानिक सत्राचे आयोजन

इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए), नवी मुंबईत वैज्ञानिक सत्र

नवी मुंबई, १९ जुलै २०२२:- अपोलो हॉस्पिटल्सने इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए), नवी मुंबईच्या सहयोगाने प्रौढांच्या लसीकरणावर एका वैज्ञानिक सत्राचे आयोजन केले होते.  १०० हुन जास्त जनरल प्रॅक्टिशनर्स या कंटिन्यूइंग मेडिकल एज्युकेशन (सीएमई) सत्रामध्ये सहभागी झाले होते. 

आरोग्याशी निगडित विविध घटकांमध्ये प्रौढांचे लसीकरण हा असा भाग आहे ज्याच्याकडे अद्याप देखील पुरेसे लक्ष दिले जात नाही. पण 25% मृत्यू संसर्गजन्य आजारांमुळे होतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने लसीकरण करवून घेतले पाहिजे. गंभीर आजारांना आळा घातला जावा, गंभीर विषाणूजन्य आजार पसरण्याचे प्रमाण कमी व्हावे तसेच ज्यांना आजारांचा सर्वाधिक धोका आहे अशा व्यक्तींमध्ये आजाराची गंभीरता कमी केली जावी आणि मृत्यूंचे प्रमाण कमी व्हावे यासाठी लसीकरण आवश्यक आहे.

डॉ भारत अगरवाल, कन्सल्टन्ट इंटर्नल मेडिसिन, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई म्हणाले, "हेपेटायटिस ए आणि बी या आजारांना प्रतिबंध घालणे, लसीकरण आणि त्यावरील उपचार यांचा विचार करता आजची जी परिस्थिती आहे त्यानुसार हेपेटायटिस सी आणि ई यांच्या विरोधात आपल्याला अजून जास्त काम करणे गरजेचे आहे." 

कन्सल्टन्ट पल्मोनोलॉजी डॉ जयलक्ष्मी टीके, कन्सल्टन्ट ऑब्स्टरिक्स व गायनॅकॉलॉजी डॉ मिनी नंपुतीरी, कन्सल्टन्ट इंटर्नल मेडिसिन डॉ भारत अगरवाल, कन्सल्टन्ट इंटर्नल मेडिसिन डॉ वैशाली लोखंडे आणि कन्सल्टन्ट इंटर्नल मेडिसिन डॉ आनंद मिश्रा यांनी प्रौढांच्या लसीकरणाबाबत सर्वसमावेशक आढावा घेत आप-आपली सत्रे घेतली. अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईचे कन्सल्टन्ट इंटर्नल मेडिसिन डॉ आनंद मिश्रा यांनी प्रौढांच्या लसीकरणाचे महत्त्व व त्यातून मिळणारे लाभ यांची माहिती दिली.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..