मेरे देश की धरती ॲमेझॅान प्राइमवर

दिव्येंदु शर्माचा मेरे देश की धरती ॲमेझॅान प्राइमवर

सध्या ऑनलाइन प्लॅटफोर्मवर वेगवेगळ्या मनोरंजक चित्रपटांचा नजराणा प्रेक्षकांना अनुभवायला मिळत आहे. चित्रपटांच्या या रंजक प्रवासात प्रेक्षकांची आणि समीक्षकांच्या पसंतीची पोचपावती मिळवणारा दिव्येंदु शर्माचा मेरे देश की धरती हा चित्रपट आता प्रेक्षकांना घरबसल्या ॲमेझॅान प्राइम व्हिडिओवर’ पहाता येणार आहे. वेगळा विषय मांडणारा हा चित्रपट थिएटरमध्ये पाहण्याची तुमची संधी हुकली असेल तर आता या चित्रपटाचा आस्वाद ॲमेझॉन प्राइम’ वर घेता येईल. नुकताच हा चित्रपट ॲमेझॅान प्राइम व्हिडिओवर आला आहे. ॲमेझॉन प्राइम व्हिडिओच्या निमित्ताने हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आल्याने प्रेक्षकांकडून आनंद व्यक्त होत आहे.

वेगळा विचार करून एकजुटीने केलेली कोणतीही गोष्ट नेहमीच लक्षवेधी आणि यशस्वी ठरतेमग ते देशाचे राजकारण असो वा कल्पकतेचा अविष्कार. एकदा का मनात आणलं तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. नव्या कल्पनांचा शोध घेऊन दोन तरुण इंजिनिअर्स एका गावाचा कसा कायापलट करतात हे दाखवून देणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फराझ हैदर यांनी केलं आहे. मिर्झापूर फेम दिव्येंदु शर्माअनुप्रिया गोएंका आणि अनंत विधात या आघाडीच्या कलाकारांसोबत ईंनाम्युलहकब्रिजेंद्र कालाराजेश शर्माअतुल श्रीवास्तवफारुख झफर या प्रतिभावान कलाकारांनी या चित्रपटात काम केले आहे.

ॲमेझॅान प्राइम व्हिडिओ’ वर ही ‘मेरे देश की धरती’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय असं कार्निवल मोशन पिक्चर्सच्या संस्थापक आणि संचालिका वैशाली सरवणकर यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..