डान्स महाराष्ट्र डान्स हा लिटिल मास्टर्स

 सूत्रसंचालकाच्या भूमिकेत संदीप पाठक

डान्स महाराष्ट्र डान्स हा लिटिल मास्टर्स हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमासाठी बच्चेकंपनी उत्सुक आहे कारण या कार्यक्रमाचं स्वरूप काहीस वेगळं असणार आहे. चिंचि चेटकीण या कार्यक्रमात तिची जादू दाखवणार आहे आणि त्यामुळे छोट्या दोस्तांना या कार्यक्रमातून अफाट मनोरंजन मिळणार यात शंकाच नाही. सोनाली कुलकर्णी आणि गश्मीर महाजनी हे दोघे या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका निभावणार आहेत पण या या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक कोण असेल हा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय. तर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे अभिनेता संदीप पाठक.
आपल्या या नवीन भूमिकेबद्दल बोलताना संदीप पाठक म्हणाला, "आपण कितीही मोठे झालो तरी आपल्यामध्ये एक लहान मुलं दडलेलं असतं आणि आपण सर्वजण बालपणात रमतो. डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स हा कार्यक्रम प्रेक्षकांना त्यांच्या लहानपणीच्या दिवसांना उजाळा देईल. या कार्यक्रमातील स्पर्धक खूपच टॅलेंटेड आहेत त्यामुळे मी त्यांचा डान्स हा एन्जॉय करणार आहे. तसेच स्पर्धक, चेटकीण, परीक्षक, प्रेक्षक यांच्यामधला मी सुसंवाद बनणार आहे. मंचावर एक खेळीमेळीचं वातावरण ठेवून कार्यक्रमात एक एनर्जी पेरायची जबाबदारी माझी आहे."
तेव्हा पाहायला विसरू नका डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स २७ जुलै पासून बुधवार आणि गुरुवार रात्री ९.३० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर    

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..