वी-ट्रान्स (इंडिया) लिमिटेड

वी-ट्रान्स (इंडिया) लिमिटेडच्या श्री महेंद्र शाह यांची

ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदोन्नती

 

मुंबई, २८ जुलै, २०२२: देशातील एक अग्रगण्य सिंगल विंडो लॉजिस्टिक सोल्युशन प्रदाता असलेल्या वी-ट्रान्स (इंडिया) लिमिटेड ने श्री महेंद्र शाह यांना वी-ट्रान्स (इंडिया) लिमिटेड समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदोन्नती दिली आहे. अगोदर ते व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहत होते. 


त्यांना लॉजिस्टिक व्यवसायात ४७ वर्षांहून अधिक अनुभव आहे, आणि संस्था आता जिथे आहे तिथे नेण्यात आणि मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. गेली २५ वर्षे ते या सर्व गोष्टींची जबाबदारी सांभाळत आहेत आणि या पदोन्नतीनंतर त्यांचा उत्साह आणि आवेश अनेक पटींनी वाढणार आहे.


हा वारसा पुढे चालू ठेवत, ते दीर्घकालीन नियोजन, व्यवसाय आणि विस्तार योजना तसेच धोरण-निर्धारणाचे नेतृत्व करतील. मंडळाला मार्गदर्शन करतील, दीर्घकालीन उद्दिष्टे आणि प्राधान्यक्रमांची पूर्तता सुनिश्चित करतील. 


अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून आपल्या पदोन्नतीबद्दल बोलताना, श्री महेंद्र शाह म्हणाले, “व्यवसायाचे नेतृत्व करताना माझ्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत आणि हा माझा आनंद आहे. कार्यक्षम तंत्रज्ञान आणि सानुकूलित सोल्यूशन्सद्वारे लॉजिस्टिक एज प्रदान करताना लॉजिस्टिक्सच्या क्षेत्रात सर्वोत्कृष्ट होण्याचा कंपनीचा दृष्टिकोन पुढे नेण्याचा मी प्रयत्न करेन. कौटुंबिक व्यवसाय असल्याने संचालक मंडळ आणि संचालक मंडळाचे सदस्य असलेल्या कुटुंबातील इतर सदस्यांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. आम्ही आमच्या ग्राहकांना सर्वोत्कृष्ट प्राधान्य देऊन सर्वोत्कृष्ट वर्गातील एकात्मिक उपाय प्रदान करण्याच्या उद्देशाने एक एकत्रित आणि सहयोगी संघ म्हणून काम करू, ज्यामुळे आमच्या ग्राहकांना समाधान आणि आनंद मिळेल.”


याआधी, श्री. शहा यांनी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम केले, व्यवसाय चालवला आणि "चेंज एजंट" म्हणून संस्थेचे नेतृत्व केले. आपल्या दूरदर्शी दृष्टी आणि दीर्घकालीन नियोजनाने या व्यवसायात आघाडीवर राहून त्यांनी बदलत्या व्यावसायिक वातावरणाला अनुसरून संस्थेचा विस्तार आणि वाढ सुनिश्चित केली आहे. त्यांचा असा विश्वास आहे की, लॉजिस्टिक्स आणि वाहतूक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची अधिक गरज आहे. मानवी संबंध आणि सर्वोत्तम सेवा या उद्योगासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि श्री. शाह या दोन्ही गोष्टींमध्ये मास्टर आहेत.


श्री शाह हे राजकोटच्या अत्यंत प्रतिष्ठित राजकुमार कॉलेजचे टॉपर आहेत आणि त्यांनी मुंबईच्या सिडनहॅम कॉलेजमधून वाणिज्य शाखेत पदवी पूर्ण केली आहे. आरोग्याची पूर्ण काळजी घेणारी व्यक्ती असल्याने सतत योगा आणि ध्यानधारणा करत असतात आणि त्यांना खेळाची खूप आवड आहे. त्याच बरोबर इतरांच्या मनात उत्साह निर्माण करणारा नेता आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

Racks & Rollers..