जागतिक प्लास्टिक सर्जरी दिवस

रुग्णाला उजव्या हाताच्या अंगठ्या ऐवजी पायाचा अंगठा प्रत्यारोपित केला 

क्रश मशीनमध्ये रुग्णाचा हाताचा अंगठा सांध्याच्या हाडापासून संपूर्ण कापला गेला होता

नवी मुंबई, १६ जुलै २०२२: जागतिक प्लास्टिक सर्जरी दिवस दरवर्षी १५ जुलै रोजी साजरा केला जातो. कालांतराने प्लास्टिक सर्जरी आणि कॉस्मेटिक सर्जरीचा कल वाढला आहे. जंतुसंसर्ग, कर्करोग, अपघात, भाजणे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे शरीराच्या अवयवांचे नुकसान झाल्यास प्लास्टिक सर्जरी केली जाते. त्याचबरोबर अंगांचे सौंदर्य वाढवणे हा कॉस्मेटिक सर्जरीचा उद्देश आहे.

आघाडीचे टर्शरी केयर अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईमध्ये एका रुग्णाच्या कापलेल्या हाताच्या अंगठ्याच्या जागी त्याच्या पायाचा अंगठा यशस्वीपणे प्रत्यारोपित करण्यात आला. हा ३६ वर्षीय रुग्ण खारघरला राहणारा असून, एका क्रश मशीन अपघातामध्ये त्याला त्याच्या हाताचा अंगठा गमवावा लागला होता. या अपघातामध्ये त्याच्या उजव्या हाताचा अंगठा बोटाच्या सांध्याच्या हाडापासून पूर्णपणे तुटला आणि तो पुन्हा बसवता येणे शक्य नव्हते.

डॉ. विनोद विज, कन्सल्टन्ट-प्लास्टिक व कॉस्मेटिक सर्जन, अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई म्हणाले, "पायाचा अंगठा हाताच्या अंगठ्याच्या जागी बसवायला या रुग्णाने सुरुवातीला नकार दिला आणि त्याऐवजी ग्रोईन फ्लॅप कव्हरचा पर्याय स्वीकारला. पण सर्जरी करण्यात आल्यानंतर ऑपरेशनच्या जागी मोठा भाग तयार झाला होता तो या रुग्णाला नीट वाटत नव्हता. ग्रोईन फ्लॅप कव्हर पुढे जाऊन बोन ग्राफ्टिंगमार्फत अंगठा लांब करण्याची योजना डोळ्यासमोर ठेवून जोडण्यात आले होते आणि त्यामुळे बोटात जी विकृती येईल ती दूर करण्यासाठी डिस्ट्रॅक्टरच्या मदतीने एक सर्जरी करण्याचे ठरले होते. सरतेशेवटी रुग्णाची परवानगी घेऊन पायाचा अंगठा त्याच्या कापलेल्या अंगठ्याच्या जागी यशस्वीपणे प्रत्यारोपित केला गेला. त्यानंतर रुग्णाला त्या अंगठ्याच्या सर्व प्रकारच्या हालचाली करता येऊ लागल्या व तो पूर्णपणे बरा झाला. शस्त्रक्रियेनंतर पाचव्या दिवशी या रुग्णाला घरी पाठवण्यात आले. पुढील सहा आठवडे फिजिओथेरपी घेतल्यानंतर त्या रुग्णाला अंगठ्याच्या साहाय्याने सर्व प्रकारच्या हालचाली करता येऊ लागल्या."

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

Racks & Rollers..