मराठी चित्रपट 'ऑटोग्राफ'ची घोषणा

एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटच्या वतीने या वर्षातील सर्वोत्तम मनोरंजक चित्रपट 'ऑटोग्राफ'ची घोषणा

सतीश राजवाडे दिग्दर्शित आणि अंकुश चौधरीअमृता खानविलकरउर्मिला कोठारेमानसी मोघे यांच्या प्रमुख भूमिका असलेलीएक जपून ठेवावी अशी लव्हस्टोरी ' ऑटोग्राफ ' होणार डिसेंबरमध्ये प्रदर्शित

मुंबईसतीश राजवाडे यांचे दिग्दर्शन असलेली एक जपून ठेवावी अशी लव्हस्टोरी 'ऑटोग्राफ'मध्ये अंकुश चौधरीअमृता खानविलकरउर्मिला कोठारेमानसी मोघे या लोकप्रिय कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेतही कथा आहे प्रेम आणि प्रेमभंगाची  वर्षानुवर्षे जपलेल्या त्यांच्या आठवणींची.  ही कथा आहे एका व्यक्तीच्या खऱ्या प्रेमाच्या शोधाची आणि त्याच्या या प्रवासात त्याला भेटलेल्या माणसांचीएका अनोख्या अशा दृष्टिकोनाची ही प्रेमकथा 'ऑटोग्राफ३० डिसेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होण्यास सज्ज आहे

एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट ही मराठीमधील एक आघाडीची निर्मिती कंपनी आहेकंपनीने गेल्या काही वर्षांमध्ये अत्यंत गाजलेल्या आणि लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटांची निर्मिती केली आहेहृदयाला भिडणाऱ्या संकल्पना आणि जिव्हाळ्याच्या विषयांवरील या चित्रपटांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजनसुद्धा केले आहेनिर्माते संजय छाब्रिया आणि अश्विनआंचन पुन्हा एकदा 'ऑटोग्राफ'च्या माध्यमातून आपले हे वैशिष्ट्य अधोरेखित करण्यास सज्ज झाले आहेत.

 

या चित्रपटात मराठी चित्रपट सृष्टीतील अत्यंत प्रतिभावान कलाकार काम करत असून चित्रपट अगदी ताज्यातवान्या संकल्पनेवर बेतला आहेही कथा आपल्या कायमची लक्षात राहील अशीच आहे.

 

एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटच्या वतीने संजय छाब्रिया यांनी 'ऑटोग्राफ'च्या वर्षअखेरीस होणाऱ्या प्रदर्शनाची घोषणा सोमवारी केलीया चित्रपटात पडद्यावर आणि पडद्यामागे जी मोठमोठी नावे जोडली गेली आहेतत्यामुळे या चित्रपटाबद्दल मराठी चित्रपटसृष्टीत एकच चर्चा आहे

 

सतीश राजवाडे हे आज एक घराघरात पोहोचलेले नाव आहेकेवळ एक प्रथितयश दिग्दर्शकच नव्हे तर एक चांगला लेखक आणि अभिनेता म्हणूनही ते मराठी  हिंदी चित्रपसृष्टीत ओळखले जातातअनेक लोकप्रिय आणि पुरस्कारविजेते चित्रपट त्यांच्या नावावर आहेतमुंबई-पुणे-मुंबई ही तीन चित्रपटांची मालिकाप्रेमाची गोष्टती सध्या काय करतेयआपला माणूस आणि इतरही अनेक चित्रपटांचा त्यात समवेश आहे. 'ऑटोग्राफ'बद्दल बोलताना राजवाडे म्हणाले, "या चित्रपटामध्ये आपल्या प्रियजनांना जवळ आणण्याची आणि आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेल्या व्यक्तींची आठवण करून देण्याची ताकद आहे.  एखाद्या 'ऑटोग्राफ'प्रमाणे ज्या माणसांनी आपल्या आयुष्याला आकार दिला आहे आणि आपल्या आयुष्यावर आपला ठसा उमटवला आहेअशांची आठवण ही कथा करून देते.  या कथेत सुख-आनंद देणारे क्षण असतीलतसेच अपरिहार्यपणे चटका लावणारेही प्रसंग असतीलपण सरतेशेवटी अंतिम अनुभव हा हृदयाला भिडणारा असेलही कथा आपल्यापैकी प्रत्येकजण आपल्या हृदयात आयुष्यभर जपून ठेवेल अशीच आहे."

 

"ऑटोग्राफही अद्वितीय अशी प्रेमकथा आहे आणि हा चित्रपट पाहणाऱ्याच्या मनावर ती कायमचा ठसा उमटवेल," असे उद्गार संजय छाब्रिया यांनी काढलेते पुढे म्हणाले, "या चित्रपटाचे मुख्य श्रेय आमचे प्रतिभावान दिग्दर्शक सतीश राजवाडे यांना जातेत्यांनी सातत्याने दर्जेदार निर्मिती केली आहेत्याशिवाय दमदार कथेला प्रत्येक कलाकाराकडून भक्कम अभिनयाची साथ लाभली आहेत्यामुळे चित्रपटाचा दर्जा अधिक उंचावला आहेएक दर्जेदार चित्रपट देण्यासाठी जे जे करणे गरजेचे होते ते आम्ही केले असून चित्रपट प्रेक्षकांसमोर आणायला आम्ही आतूर आहोतआम्ही जे चित्रपटाबाबत म्हणत आहोतत्याची प्रचिती रसिकांना चित्रपट पाहिल्यावर येईलआणि त्यांचेही तेच मत होईलयाची पूर्ण खात्री आम्हाला आहे."

 

एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटने आत्तापर्यंत मी शिवाजीराजे भोसले बोलतोयमुंबई-पुणे-मुंबई ही तीन चित्रपटांची मालिकावेडींगचा शिणेमाबापजन्मआम्ही दोघीतुकारामआजचा दिवस माझाहॅप्पी जर्नीकॉफी आणि बरंच काहीटाइम प्लीज यांसारखे अनेक दर्जेदार आणि गाजलेले चित्रपट दिले आहेतत्याबाबतीत कंपनीचे नाव आदराने घेतले जाते. 'ऑटोग्राफप्रेक्षकांची मने आणि ह्रदये जिंकेलअसा ठाम विश्वास निर्मात्यांना आहे.

https://www.youtube.com/watch?v=35ajb71YxZM

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

Racks & Rollers..