भाग्य दिले तू मला मालिकेने गाठला १०० भागाचा टप्पा !

काकू बोक्याची जोडी आहे हिट !

भाग्य दिले तू मला मालिकेने गाठला १०० भागाचा टप्पा !

मुंबई २७ जुलै२०२२ : सध्या काकू - बोक्याची जोडी भलतीच लोकप्रिय होताना दिसून येत आहे. काकू बोक्या म्हणजे नक्की कोण असा प्रश्न तुम्हांला पडला असेल तर दुसरे कोणी नसून कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला मालिकेतील राजवर्धन आणि कावेरी. राजवर्धन आणि कावेरी आता प्रेक्षकांना आपल्याला घरातील सदस्य वाटू लागले आहेत. मालिकेच्या पहिल्या प्रोमोपासून या दोघांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. मग ते त्यांच्यातील मतभेद असो वा छोटी छोटी भांडण असो वा एकमेकांना केलेली मदत असो. कावेरीचं मनं राखण्यासाठी राजनं केलेले सेलिब्रेशन असो वा काकूमुळे बोक्याला इन्व्हेस्टर मिळाला असो वा काकूने राजवर्धन आणि रत्नमालाला एकत्र आणण्यासाठी केलेली मदत असो वा बोक्याने काकूला घरकामात केलेली मदत असो सगळ्याच गोष्टीघटना प्रेक्षकांना आवडत आहेत. इतकेच नसून मालिकेतील त्यांची जोडी प्रेक्षकांना आडवतेच आहे पणऑफस्क्रीन देखील त्यांचे धम्माल रील चर्चेत असतात. कावेरी म्हणजे तन्वीचे इन्स्टावर १ लाखाहुन अधिक followers आहेत. त्यांचा हॅशटॅग #राजवेरी देखील बराच व्हायरल होताना दिसून येतो आहे. बघता बघता भाग्य दिले तू मला मालिकेने १०० भागांचा टप्पा यशस्वीरीत्या गाठला आहे. हे सर्वकाही रसिक प्रेक्षकांच्या मिळत असलेल्या भरभरून प्रेमाने शक्य झाले आहे . तेव्हा असेच प्रेम करत राहा.

आता मालिकेत माहेरचा चहा कंपनीच्या वर्धापन दिनच्या दिवशी राज जाणार कायाची उत्सुकता सगळयांनाच लागून राहिली आहेरत्नमाला आणि राजवर्धन मधला दुरावा काकू दूर करू शकेल कातर दुसरीकडेकाकू आणि बोक्याचे कोणीतरी फोटोज काढत आहेत कोण असेल ती व्यक्ती ? "माहेरचा चहा" च्या वर्धापन दिना दिवशी सुदर्शन काकाने राजच्या विरोधात कोणता प्लॅन आखलायमालिकेत पुढे काय होणार जाणून घेण्यासाठी बघत राहा भाग्य दिले तू मल रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..