मुंबईतील डॉक्टर अगरवाल्स आय हॉस्पिटलने इनाली फाउंडेशनला ‘लिम्ब्स ऑन व्हील्स’ ...

मुंबईतील डॉक्टर अगरवाल्स आय हॉस्पिटलने इनाली फाउंडेशनला लिम्ब्स ऑन व्हील्स ही खास तयार केलेली व्हॅन देणगी म्हणून दिली

मुंबई, 22 सप्टेंबर 2022 : मुंबईतील वडाळा येथील डॉ. अगरवाल्स आय हॉस्पिटलचे युनिट असलेल्या आदित्य ज्योत आय हॉस्पिटलच्या वैद्यकीय सेवा विभागाचे प्रमुख पद्मश्री प्रा. डॉ. एस. नटराजन यांनी लिम्ब्स ऑन व्हील्स या खास तयार करण्यात आलेल्या व्हॅनला हिरवा कंदील दाखवला. डॉ. अगरवाल्स आय हॉस्पिटल ग्रुपतर्फे इनाली फाउंडेशनला ही व्हॅन देणगी म्हणून देण्यात आली आहे.

या प्रसंगी डॉ. अगरवाल्स आय हॉस्पिटल्स वर्ल्डवाइड आणि मुंबईतील डॉ. अगरवाल्स आय हॉस्पिटलचे युनिट असलेल्या आदित्य ज्योत आय हॉस्पिटलचे प्रमुख व्हिट्रिओ रेटिना सर्व्हिसेसचे प्रमुख प्रा. डॉ. एस. नटराजन म्हणाले, “या अत्यंत विस्मयकारक प्रकल्पाशी जोडले जाणे हा आमच्यासाठी अत्यंत अभिमानस्पद क्षण आहे. ज्या दिव्यांगांना प्रोस्थेटिक लिंब (कृत्रिम हात किंवा पाय) परवडत नाही त्यांना तो उपलब्ध करून देणे हा इनाली फाउंडेशनचा एक उत्तम उपक्रम आहे. ही खास तयार केलेली व्हॅन त्यांच्या उपक्रमाला पाठबळ देणार आहे. या व्हॅनच्या माध्यमातून ते देशातील कानाकोपऱ्यात आणि वंचित लोकांपर्यंत पोहोचू शकतील. गरजूंना मदत करून लिम्ब्स ऑन व्हील्स प्रोस्थेटिक व्हॅन उपक्रम देशाला व लोकांना एक उपयुक्त सेवा देऊ शकेल, अशी मला आशा आहे. आम्ही इनाली फाउंडेशनच्या भविष्यातील प्रयत्नांनाही मदत करत राहू आणि लिम्ब्स ऑन व्हील्ससाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो.

ज्या लोकांनी जन्मापासून किंवा एखाद्या अपघातामुळे हात गमावले आहेत त्यांना कृत्रिम हात उपलब्ध करून देण्यासाठी इनाली फाउंडेशन मदत करते. आर्थिक किंवा वैयक्तिक कारणामुळे कृत्रिम हात किंवा पाय विकत घेऊ न शकणाऱ्या भारतातील दुर्गम भागांतील वंचित लोकांसाठी ही फाउंडेशन काम करते.  गावात किंवा इतर ग्रामीण व्यवस्थेमध्ये हात किंवा पाय तयार करण्यासाठी व बसविण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा या खास तयार केलेल्या व्हॅनमध्ये आहेत.


इनाली फाउंडेशनचे संचालक आणि संस्थापक प्रशांत गाडे म्हणाले, “या देणगीबद्दल आम्ही डॉ. नटराजन सुंदरम आणि डॉ. अगरवाल्स आय हॉस्पिटलचे कृतज्ञ आहोत. इनाली फाउंडेशनच्या उपक्रमासाठी मदत करण्यासाठी आम्ही डॉ. अगरवाल्स आय हॉस्पिटलशी संपर्क साधला होता. त्यांना लिम्ब्स ऑन व्हील्स ही संकल्पना आवडली आणि लगेचच या प्रकल्पाला मदत करण्याचे ठरविले. डॉ. नटराजन यांनी त्यांच्या आयुष्यात नेहमीच मानवतावादी भूमिका घेतली आहे आणि आतापर्यंत गेली अनेक वर्षे त्यांनी सामाजातील वंचित गटातील लोकांची सेवा केली आहे. आमची साथ कायम राहील आणि डॉ. अगरवाल्स आय हॉस्पिटलच्या सहयोगाने आम्ही कृत्रिम हात किंवा पायाची आवश्यकता असलेल्या वंचित गटातील अधिकाधिक लोकांना मदत करू शकू, अशी आम्हाला आशा आहे.”


एका वेळी 500-1000 प्रोस्थेटिक हात व पाय वाहून नेण्याची क्षमता या व्हॅनमध्ये आहे. या व्हॅनमध्ये इनाली फाउंडेशनचे तीन कर्मचारी असतील जे कृत्रिम हात किंवा पाय बसवतील. कोणत्याही ठिकाणी कृत्रिम हात किंवा पाय तयार करण्यासाठीचे उपकरण या व्हॅनमध्ये आहे. देशातील विविध दुर्गम भागांमध्ये इनाली फाउंडेशन 10 दिवसांचे शिबिर आयोजित करेल आणि त्या माध्यमातून दिव्यांगांना कृत्रिम हात-पाय उपलब्ध करून देण्यात येतील.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Anand Rathi Share & Stock Brokers...

BlueStone Jewellery & Lifestyle IPO