नेत्राची दिव्य शक्ती बनणार अद्वैतसाठी वरदान ?
नेत्राला साक्षात त्रिनयना देवीनेच भविष्य पाहू शकण्याचं वरदान दिलंय. नेत्राला तिच्याकडील या दिव्यशक्तीचा वापर समाजाच्या भल्यासाठी करायचा आहे. परंतु तिला भविष्य दिसत असलं तरी तिचं आयुष्य सोपं नाही. नेत्रा भविष्यात जे घडणार आहे, त्याबद्दल बोलते. पण लोक तिला समजून न घेता तिच्यावर दोषारोप करतात. तिला हिणवतात म्हणून नेत्रा गाव सोडून जाते. मालिकेत येत्या काही भागांमध्ये नेत्रालाला अपघात होतानाचे संकेत दिसणार आहेत.
या अपघातामध्ये अव्दैतचा जीव धोक्यात आहे, नेत्रा तिच्या दिव्यशक्तीच्या बळावर अव्दैतचा जीव वाचवू शकणार आहे की नाही, ते पुढील भागांमध्ये पहायला मिळणार आहे. नेत्राची दिव्यशक्ती बनेल का अद्वैतसाठी वरदान, हे पाहणं उत्कंठा वाढवणारं असणार आहे.
त्यासाठी पाहायला विसरू नका ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.
Comments
Post a Comment