३६ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दिया चितळे, स्वस्तिका घोष यांची आगेकूच कायम

३६ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा

दिया चितळे, स्वस्तिका घोष यांची आगेकूच कायम

सूरत-

महाराष्ट्राच्या दिया चितळे, स्वस्तिका घोष व रीथ रीशा टेनिसन यांनी टेबल टेनिस मधील महिलांच्या एकेरीत आगेकूच राखली. मात्र महाराष्ट्राच्या श्रुती अमृते व अनन्या बसाक यांना पराभव स्वीकारावा लागला.

येथील इनडोअर स्टेडियम मध्ये हे सामने आयोजित करण्यात आले आहेत. रीथ रीशा हिने तामिळनाडूच्या सी. हर्षवर्धिनी हिचा १३-११,११-६,११-८,११-२ असा पराभव केला. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारी दिया चितळे हिने हरियाणाच्या त्रिशा पॉल हिचे आव्हान ११-३,११-६,११-४,१२-१० असे संपुष्टात आणले. तिने काउंटर ॲटॅक पद्धतीचा सुरेख खेळ केला‌. स्वस्तिका घोष हिला तामिळनाडूच्या व्ही. कौशिका हिच्या विरुद्ध ११-८,११-७,११-५,११-६ असा चार गेम्स मध्ये विजय मिळाला. तिने परतीच्या फटक्यांचा अप्रतिम खेळ केला. 

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारी श्रिजा अकुला हिने महाराष्ट्राच्या अनन्या बसाक हिला १३-११,११-३, ११-८,११-८ असे हरविले. महाराष्ट्राची खेळाडू श्रुती अमृते हिला कर्नाटकच्या व्ही. खुशी हिच्याविरुद्ध चिवट लढतीनंतर हार पत्करावी लागली. खुशी हिने हा सामना ११-८,८-११, ६-११, ११-५,४-११,१२-१०,१२-१० असा जिंकला.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Anand Rathi Share & Stock Brokers...

BlueStone Jewellery & Lifestyle IPO