घटस्थापनेपासून आम्ही सारे खवय्ये पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला.

आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी

असं म्हणतात कीमाणसाच्या हृदयाचा रस्ता त्याच्या पोटातून जातोत्यामुळे झणझणीत आणि चमचमीत पदार्थांनी सगळ्यांना तृप्त करण्याच्या प्रयत्न गृहिणी करीत असतातरोज रोज नवीन आणि वेगळं काय करायचंयासाठी त्या विविध माध्यमं शोधत असतातया सुगरणींची मदत झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम 'आम्ही सारे खवय्ये' नित्यनियमाने करत होतापण आता जवळपास  वर्षानंतर महिलावर्गाचा लाडका आणि आवडता कार्यक्रम आम्ही सारे खवय्ये येत्या घटस्थापनेपासून म्हणजेच २६ सप्टेंबर पासून सोमवार ते शनिवार दुपारी .३० वा. पुन्हा एकदा भेटीस येतोय.

 

प्रशांत दामले आणि संकर्षण कऱ्हाडे हेच ह्या पर्वाची सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणार आहेतकोल्हापूर पासून या पर्वाची सुरुवात होत असून महाराष्ट्रातील गावागावात आणि शहरातील सोसायटी मध्ये आम्ही सारे खवय्ये रंगणार आहेआम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी हे या नवीन पर्वाचे नाव असून या पर्वाची खासियत म्हणजे इथे सासू सूनआई मुलगानवरा बायको पाककृती जोडीने बनवणार आहेत आणि कलाकारांच्या जोड्या ही प्रेक्षकांचं मनोरंजन करतील.

 

या नवीन पर्वाबद्दल बोलताना संकर्षण म्हणाला पुन्हा हा कार्यक्रम सुरु होतोय त्याबद्दल मी नक्कीच आनंदी आहे आणि उत्सुक आहे परत एकदा मला गृहिणींच्या घरी जाऊन त्यांनी बनवलेल्या पाककृतींची चव चाखता येणार आहे.

 

तेव्हा पाहायला विसरू नका आम्ही सारे खवय्ये’ २६ सप्टेंबर पासून सोमवार ते शनिवार दुपारी .३० वाझी मराठीवर. 

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Anand Rathi Share & Stock Brokers...

BlueStone Jewellery & Lifestyle IPO