राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत सोलापूरचे वर्चस्व

राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत सोलापूरचे वर्चस्व 

मुलांमध्ये मुंबईचा विशाल जाधव तर मुलींमध्ये  सोलापूरची ज्योत्स्ना मदने सिंगल प्रकारात सुवर्णपदक प्राप्त विजेते....

भारतीय स्वात॔ञ्याच्या अमृत महोत्सव वर्षाचे अवचित साधून सोलापूर जिल्हा सॉफ्ट टेनिस असोसिएशन, छत्रपती शिवाजी रात्र वरिष्ठ महाविद्यालय ,महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने व महाराष्ट्र राज्य सॉफ्ट टेनिस असोसिएशन यांच्या मान्यतेने राज्य संघटनेचे राज्य अध्यक्ष  माननीय श्री सुनील रघुनाथ  पूर्णपात्रेजी व  राज्य संघटनेचे सचिव श्री रवींद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली 10 वी सीनियर व 9वी सब ज्युनिअर राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेचे आयोजन  जिल्हा लॉन टेनिस कोर्ट, कुमठा नाका, सोलापूर येथे करण्यात आले होते.

राज्यस्तरीय स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सोलापूर दक्षिणचे गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन समितीचे अध्यक्ष राजीव देसाई हे होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती गटशिक्षणाधिकारी उत्तर सोलापूर चे श्री बापूराव जिल्हा संघटनेचे अध्यक्ष श्री सिद्धेश्वर पाटील, क्रीडा अधिकारी व सदर वरील स्पर्धे साठी निरीक्षक म्हणून खास शासनाने नेमणूक केलेले श्री सत्येन जाधव सर , तालुका क्रीडा अधिकारी श्री गणेश पवार सर , श्री  राज्य संघटनेचे उपाध्यक्ष श्री दिपक आरडे, निलेश हारदे,विजय पळसकर, विजयकुमार मुळीक, शंतनू गायकवाड, प्रसाद सोनवणे,  इंगळे हे उपस्थित होते.

या बक्षीस समारंभ प्रसंगी सोलापूर शहर व जिल्हा शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री दशरथ गुरव सर यांची गुजरात येथे होणाऱ्या राष्ट्रीय अथलेटिक्स स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाच्या टीम मॅनेजर म्हणून निवड झाल्याबद्दल राज्य संघटनेचे सचिव श्री रवींद्र सोनवणे सर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

सदर स्पर्धेस खलील प्रमाणे पंचांची नेमणूक सॉफ्ट टेनिस असोसिएशनचे  राज्याध्यक्ष  माननीय श्री सुनील रघुनाथ पूर्णपात्रे यांनी केली.   

 या स्पर्धेला पंच म्हणून आंतरराष्ट्रीय पंच श्री  निलेश हारदे (औरंगाबाद,) संजय नागरे (उस्मानाबाद), राम हंबर्डे सांगली , संदीप व्यवहारे (जळगाव ) अर्चना पाटील (सांगली ) सुधीर सालगुडे, महेश झांबरे, उमेश बडगिरे, विनोद मोरे कार्तिक भंडारी चंद्रकांत वाघमोडे बालाजी केदार ( सोलापूर) यांनी काम पाहिले.

विशेष म्हणजे सदर स्पर्धेत कोणत्याही संघाची कोणतीही तक्रार आली नसल्याने वरील पंचांनी त्यांची  चांगली भूमिका बजावली या बाबत श्री सुनील पूर्णपात्रे अध्यक्ष यांनी समाधान व्यक्त केले.

या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सोलापूर जिल्ह्य क्रीडा अधिकारी श्री.नितिन तारलकर व त्याच्या कार्यलयातील सर्वांची साथ लाभली.सॉफ्टटेनिस जिल्हा सचिव प्रा. संतोष गवळी ,आयोजन समितीचे उपाध्यक्ष श्री.मारुती घोडके, आयोजन समिती चे सचिव श्री. शिवाजी वसपटे , सहसचिव प्रशांत कदम,अक्षय गवळी, सागर व्हनखडे, प्रशांत वर्धमाने, विजय शिरसागर, विशाल जाधव, सुनील शिंदे, गणेश बंडगर, शिवशंकर दोडमनी यांनी खूपच परिश्रम घेतले.

सदर  स्पर्धेचा  निकाल  हा  माननीय श्री. सुनील पूर्णपात्रे  यांनी खालील प्रमाणे जाहीर केला.

पुरुष सिंगल  गट

1-  विशाल जाधव (मुंबई), 

2- पारस फुरसले (औरंगाबाद),

3-  घनशाम कोळी, (जळगाव),

4-  असद रिजवी (मुंबई),

सिंगल महिला गटामध्ये

1)  ज्योत्स्ना मदने (सोलापूर), 

2)  आर्या लिंगनवाद (औरंगाबाद),

3) विनिता खेदड  (बुलढाणा), 

4) आयुष्या इंगवले (पुणे),

महिला डबल्स

1) सोलापूरची ज्योत्स्ना मदने आणि पूजा यंकंची 

2) औरंगाबादचे श्रावणी आणि आर्या लिंगनवाड

 3) बुलढाण्याची विनिता व सृष्टी

 4)  पुण्याची आयुशा  व रतिका     

पुरुष डबल्स

1) पारस व ओम (औरंगाबाद),

2) राहुल व ऋतुराज (औरंगाबाद),

3) विशाल व अरुण (मुंबई),

4) घनश्याम व योगेश्वर (जळगाव),

सांघिक मुली

1) सोलापूर,

2) बुलढाणा,

3) अकोला,

4) पुणे,

सांघिक मुले

1)  मुंबई,

2)  पुणे,

3) सोलापूर,

4) जालना,

सांघिक महिला

1) सोलापूर,

2)  पुणे,

3) जळगाव,

4) औरंगाबाद,

सांघिक पुरुष

1) औरंगाबाद,

2) बुलढाणा,

3) जळगाव,

4) मुंबई,

सदर राज्य स्पर्धा ह्या व्यवस्थित पार पडल्याचे श्री रवींद्र सोनवणे सरांनी समाधान व्यक्त केले.

दिनांक १८ सप्टेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र  ऑलम्पिक अससोसिएशनची, क्रीडा व युवक संचालनालयाचे नवे आयुक्त मा. श्री. सुहास दिवसे साहेब,तसेच सर्व असोसिएशनचे प्रमुख पदाधिकारी यांच्या समवेत  मिटिंग बालेवाडी, पुणे येथे असल्याने माननीय श्री. सुनील पूर्णपात्रे यांना सदर मिटींगला जावे लागल्याने त्यांनीं सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्यात.

(श्री.रवींद्र सोनवणे , दीपक आरडे, मल्हारी बनसोडे, बापूराव जमादार, राजीव देसाई ,प्रा. संतोष गवळी, श्री शिवाजी वसपटे ,श्री मारुती घोडके व श्री अक्षय गवळी)

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Anand Rathi Share & Stock Brokers...

BlueStone Jewellery & Lifestyle IPO