महिंद्रा लॉजिस्टिक्स..
महिंद्रा लॉजिस्टिक्सतर्फे भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या खऱ्या चालकांचा सन्मान - भारतीय चालकांचा सन्मान करणाऱ्या ‘देश चालक’ पुस्तकाचे अनावरण
~ या पुस्तकांत वाहन चालकांच्या आयुष्यावर आधारित छोट्या गोष्टी समाविष्ट करण्यात आल्या असून त्यात त्यांना येणारी आव्हानं आणि तरीही काम सुरू ठेवण्याची दुर्दम्य इच्छा यांबद्दल वाचायला मिळतं. विविध समस्या येऊनही हा समाज कशाप्रकारे काम करत राहातो याचं वर्णन या पुस्तकात करण्यात आलं आहे.
मुंबई, २२ जून २०२३ - . नितिन गडकरी, माननीय मंत्री, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, भारत सरकार आणि महिंद्रा लॉजिस्टिक्स लि. (एमएमएल) या भारतातील सर्वात मोठ्या इंटिग्रेटेड लॉजिस्टिक्स सुविधा पुरवठादार कंपन्यांपैकी एक असलेल्या कंपनीने ‘देश चालक’ या पुस्तकाचे अनावरण केले. हे पुस्तक भारतीय समाजातील पडद्यामागच्या हिरोंना – चालकांना समर्पित करण्यात आले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी हा चालक वर्ग देत असलेल्या योगदानाची दखल घेत चालकांना सक्षम करण्यासाठी असलेली बांधिलकी महिंद्रा लॉजिस्टिक्स लि. ने (एमएमएल) या निमित्ताने परत एकदा अधोरेखित केली आहे. त्यासाठी एमएलएल कौशल्य विकास, स्वास्थ्य, कुटुंब कल्याण, आपत्कालीन मदत इत्यादींशी संबंधित उपक्रमांवर सातत्याने भर देते.
या पुस्तकाच्या लाँच वेळेस माननीय मंत्री, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, भारत सरकार नितिन गडकरी यांनी भारतातील चालकांचे कौतुक केले. देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी चालक समाजाने दिलेल्या योगदानाची प्रशंसा करत ते म्हणाले, ‘महिंद्रा लॉजिस्टिकने चालकांसारख्या पडद्यामागच्या योद्ध्यांच्या कामाची दखल घेण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. अखंड काम करणारा चालकवर्ग आपल्या देशाचा कणा आहे आणि देशाला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जात आहे. जागतिक दर्जाचे रस्ते आणि त्याला पायाभूत सुविधांची जोड देत आम्ही या चालकांचे आयुष्य जास्त चांगले करण्याचा प्रयत्न करत आहोत. भारताच्या विकासासाठी हा चालकवर्ग देत असलेल्या योगदानाची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लिहिण्यात आलेले ‘देश चालक’ हे पुस्तक त्या दिशेने टाकलेले योग्य पाऊल आहे.’
महिंद्रा लॉजिस्टिक्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रामप्रवीण स्वामीनाथन म्हणाले, ‘महिंद्रा लॉजिस्टिक्सचे असे ठाम मत आहे, की चालकवर्ग या क्षेत्राच्या कामकाजाचा कणा आहेतच, शिवाय ते संपूर्ण लॉजिस्टिक्स उद्योगाची ताकद आहेत. त्यांच्या असामान्य योगदानाची दखल घेण्यासाठी लिहिण्यात आलेल्या देश चलाक पुस्तकात लॉजिस्टिक उद्योग चालू ठेवण्यासाठी ते कशाप्रकारे अखंडपणे काम करत असतात याचे वर्णन वाचायला मिळते. हे पुस्तक चालकांप्रती आम्हाला वाटणाऱ्या कृतज्ञतेचे प्रतीक आहे. या पुस्तकामुळे त्यांच्या कष्टांची, योगदानाची दखल घेतली जाईल अशी आशा वाटते.’
ते पुढे म्हणाले, ‘२०२४- २०२५ पर्यंत ५ ट्रिलियन अर्थव्यवस्था बनण्याचे ध्येय ठेवले असून कनेक्टिव्हिटी, दर्जेदार पायाभूत सुविधा आणि कुशल कर्मचारी वर्ग त्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. भारतापुढे आर्थिक वर्ष २३-२४ पर्यंत प्रत्येक १००० ट्रक्समागे ४५० कुशल चालक तयार करण्याचे आव्हान आहे. आपल्या अर्थव्यवस्थेचा गाभा लॉजिस्टिक क्षेत्रातील अवजड उपकरणे आणि वाहतूक यंत्रणेवर आधारित आहे. चालक वर्ग भारताच्या लॉजिस्टिक्स आणि वाहतूक उद्योगाचा कणा आहेत व त्यांना संपूर्ण आदर मिळणे अतिशय महत्त्वाचे आहे, असे महिंद्रा लॉजिस्टिक्सला वाटते. कठोर परिश्रम आणि सामाजिक परिस्थितींमधून वाहने स्थिरपणे चालवत हे पडद्यामागचे हिरो भारताच्या अर्थव्यवस्थेची चाके पुढे नेण्यासाठी अविरत झटत असतात. या क्षेत्रातील प्रवर्तक या नात्याने आम्ही इथल्या उणीवा भरून काढण्यासाठी आणि चालकवर्गाला सतत पाठिंबा देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. चालका वर्गाला आधार देणारी यंत्रणा मिळवून देत आम्ही त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्नशील आहे.’
आपल्या चालक- भागिदारांचे जीवनमान उंचावण्यासाठ आणि सर्वसमावेशक विकास करण्यासाठी महिंद्रा लॉजिस्टिक्स बांधील आहे. चालकवर्गाच्या स्वास्थ्याला प्राधान्य देत कंपनीने त्यांचे जीवनमान उंचावले आहे, कौशल्य विकास केला आहे तसेच पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा घडवून आणल्या आहेत. त्याशिवाय स्वच्छता आणि सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करत लक्षणीय परिणाम घडवून आणण्यासाठी कंपनी काम करत असते.
सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी महिंद्रा लॉजिस्टिक्सने प्रधानमंत्री कौशल विकास योजनेअंतर्गत (पीएमव्हीकेवाय) या खास प्रशिक्षण उपक्रम सुरू केला आहे. त्यामध्ये २०,००० पेक्षा जास्त चालकांना प्रशिक्षण देण्यात आले असून जागरूकता व सक्षमतेवर भर देण्यात आला आहे.
समांतर हा चालकहित साधणारा असाच एक लक्षणीय उपक्रम असून त्यामध्ये चालकवर्गाची कामाची परिस्थिती उंचावण्याचा प्रयत्न केला जातो. एमएलएलद्वारे आरोग्यतपासणी शिबिरे, सुरक्षेविषयक माहिती, विमा योजना पुरवल्या जातात. त्याशिवाय वेगवेगळ्या शहरांत ड्रायव्हर्स डे साजरा केला जातो आणि त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती दिल्या जातात. गेल्या दशकभरात २३५,००० चालकांना या उपक्रमाचा लाभ झाला आहे. त्याशिवाय महिंद्रा लॉजिस्टिक्सने संकल्प शिष्यवृत्ती उपक्रमाअंतर्गत ११ दशलक्ष रुपयांचे वितरण करत चालकांच्या मुलांच्या शिक्षणाला पाठिंबा दिला आहे.
कोविड- १९ लॉकडाउनदरम्यान २०२० मध्ये होप (हेल्पिंग अवर पीपल इन इमरजन्सीज) उपक्रम लाँच करत कंपनीने ५००० चालकांच्या कुटुंबियांना पाठिंबा दिला होता.
महिंद्रा लॉजिस्टिक्सने आपल्या कर्मचारीवर्गात वैविध्यपूर्णता, समानता आणि सर्वसमावेशकता या मूल्यांना महत्त्व दिले आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आमचा चालक- भागीदार मजनू जो एलजीबीटीक्यू समाजातील आहे. गेल्या १५ वर्षांपासून नेहमी सुरक्षितपणे गाडी चालवण्याची उत्तम कामगिरी मजनूने केली आहे.
महिंद्रा लॉजिस्टिक्सने चालक वर्गाला सक्षम करण्यासाठी व त्यांना आदराचे स्थान मिळवून देण्यासाठी तळमळीने काम करत आहे. कंपनीच्या उपक्रमांनी चालकांचे जीवनमान उंचावण्यात व त्यांच्या योगदानाची दखल घेण्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे.
Comments
Post a Comment