ऑफिसर्स चॉईस व्हिस्‍की..

ऑफिसर्स चॉईस व्हिस्‍कीने लिमिटेड-एडिशन स्‍कॉचच्‍या लाँचसह साजरी केली ३५ वर्षे

लिमिटेड एडिशन स्‍कॉटलंडमध्‍ये डिस्टिल्ड, मिश्रित आणि बाटलीबंद केले गेले आहे

मुंबई, २७ जून २०२३: अलाइड ब्लेंडर्स अॅण्‍ड डिस्टिलर्स लिमिटेड (एबीडी इंडिया) या ऑफिसर्स चॉईस व्हिस्‍कीच्‍या उत्‍पादक कंपनीने १९८८ पासून ३५ वर्षांच्‍या प्रवासाला साजरे करण्‍यासाठी लिमिटेड एडिशन ऑफिसर्स चॉईस ब्‍लेण्‍डेड स्‍कॉच व्हिस्‍कीचे विशेष लाँच केले आहे. स्‍कॉटलंडमध्‍ये बारकाईने डिस्टिल्‍ड, मिश्रित व बाटलीबंद केलेली ही व्हिस्‍की ब्रॅण्‍डप्रती मिळणाऱ्या प्रेमळ ग्राहकांच्‍या प्रेमाप्रती मानवंदना आहे. ऑफिसर्स चॉईसने २०१३ पासून सलग १० वर्षे जागतिक स्तरावर नामांकित असलेल्‍या ३ व्हिस्कींच्या यादीत स्थान मिळवले आहे.

३५ वर्षांचा टप्‍पा साजरा करण्‍यासाठी लिमिटेड एडिशन ऑफिसर्स चॉईस ब्‍लेण्‍डेड स्‍कॉच व्हिस्‍की अशा सिंगल बॅचमधील आहे, ज्‍यामध्‍ये स्‍कॉटलंडमधून आयात करण्‍यात आलेल्‍या १२,१५६ बॉटल्‍सचा समावेश आहे. ब्‍लेण्‍ड (मिश्रण) अपवादात्‍मक चवीसह गोड व स्‍पाइसी आहे, पण सर्वांना परवडणारे आहे. हा ब्रॅण्‍ड भारतातील निवडक राज्‍यांमध्‍ये एक्‍सक्‍लुसिव्‍ह स्‍टोअर्समध्‍ये उपलब्‍ध असेल.

याप्रसंगी एबीडी इंडियाचे कार्यकारी उपाध्‍यक्ष शेखर रामामूर्ती म्‍हणाले, ‘‘१९८८ मध्‍ये लाँच झाल्‍यापासून ऑफिसर्स चॉईस व्हिस्‍कीने सातत्‍याने आपला स्‍तर उंचावला आहे आणि लाखो ग्राहकांच्‍या विश्‍वासाला जिंकले आहे. आम्‍हाला अत्‍यंत अभिमान वाटतो की, ही व्हिस्‍की आपल्‍या देशातील जनमाणसातील प्रिमिअम व्हिस्‍कीमधील बाजारपेठेत अग्रणी आणि जगभरातील नामांकित व्हिस्‍कींमध्‍ये समाविष्‍ट आहे. लिमिटेड एडिशन ऑफिसर्स चॉईस ब्‍लेण्डेड स्‍कॉच व्हिस्‍की तिच्‍या ३५व्‍या वर्षामध्‍ये कालातीत प्रवासाला साजरे करते.’’

एबीडी इंडियाच्‍या धोरण, विक्री व विपणनाचे सीओओ विक्रम बासू या लाँचबाबत म्‍हणाले, ‘‘ऑफिसर्स चॉईस व्हिस्‍की ग्राहकांमध्‍ये निश्चितच ‘चॉईसेस्‍ट’ असून गेल्या सलग १० वर्षांसाठी नामांकित ३ जागतिक व्हिस्‍की ब्रॅण्‍ड्सच्‍या यादीमध्‍ये सामील आहे. आज ही व्हिस्‍की २२ देशांमध्‍ये उपलब्‍ध आहे. ब्रॅण्‍डच्‍या ३५व्‍या वर्धापन दिनाला साजरे करण्‍यासाठी आम्‍ही या उत्तम व्हिस्‍कीचे उगमस्‍थान असलेल्‍या स्‍कॉटलंडमध्‍ये परत गेलो. ही लिमिटेड-एडिशन ऑफिसर्स चॉईस ब्‍लेण्‍डेड स्‍कॉच व्हिस्‍की फक्‍त सिंगल बॅचसाठी आहे आणि स्‍कॉटलंडमध्‍ये डिस्टिल, मिश्रित व बाटलीबंद करण्‍यात आली आहे.’’

लिमिटेड-एडिशन ऑफिसर्स चॉईस ब्‍लेण्‍डेड स्‍कॉच व्हिस्‍की महाराष्‍ट्र, पश्चिम बंगाल, तेलंगणा व हरियाणा येथील निवडक आऊटलेट्समध्‍ये ७५० मिली बॉटलमध्‍ये उपलब्‍ध असेल. हे उत्पादन स्‍पेशल गिफ्ट बॉक्‍ससह किंवा स्‍पेशल गिफ्ट बॉक्‍सशिवाय उपलब्‍ध असेल.

Comments