कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी..

कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनीचा, प्रतिजैविक प्रतिकारामधील (एएमआर) संशोधनासाठी, इग्नाइट लाइफ सायन्स फाउंडेशनशी सहयोग

मुंबई, 27 जून, 2023: कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेडने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिब्लिटी अंतर्गत (‘केएमसीसी’/ ‘कोटक इन्व्हेस्टमेंट बँकिंग’) आज इग्नाइट लाइफ सायन्स फाउंडेशनशी (आयएलएसएफ) सहयोगाची घोषणा केली. प्रतिजैविक प्रतिरोध (एएमआर) या क्षेत्रातील संशोधनाला सहाय्य करण्यासाठी हा सहयोग करण्यात आला आहे. 

वैज्ञानिक शोधांचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी करण्याचे उद्दिष्ट ठेवून आयएलएसएफ ही बेंगळुरूस्थित ना-नफा तत्त्वावरील संस्था काम करते. कोविड-19 साथीमुळे भारतातील एएमआरची वाढती समस्या सर्वांपुढे आली. ह्या विकारावर उपचार करण्यासाठी काही महागड्या प्रतिजैविक औषधांची आवश्यकता आहे आणि ही औषधे विकसित करण्याचे काम सुरू आहे. देशाला कमी किमतीतील व अधिक प्रभावी उपायांची गरज आहे. शेतीसह सर्व परिस्थितींतील प्रतिजैविक औषधांचा वापर कमी करू शकणारे उपाय देशाला हवे आहेत.  सुक्ष्मजीव प्रतिकार यंत्रणेतील नवीन ज्ञान आणि प्रादुर्भावाला कारणीभूत ठरणारा जीव जलद गतीने ओळखण्यासाठी आवश्यक निदानात्मक पद्धती ह्यांमधून एएमआरवर उपाय केला जाऊ शकतो. 

कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश श्रीनिवासन म्हणाले, “आमच्या आरोग्यसेवेतील सीएसआर प्रकल्पांमध्ये प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि स्वच्छता ह्यांचा समावेश होतो. प्रतिजैविक प्रतिकाराच्या क्षेत्रात संशोधनाच्या दृष्टीने सीएसआर निधी पुरवण्यासाठी इग्नाइट लाइफ सायन्स फाउंडेशनशी सहयोग झाला याचा आम्हाला आनंद वाटतो. या समस्यांच्या मानवी आरोग्यावरील परिणामांचे प्रमाण व महत्त्व बघता, आमच्या सीएसआर प्रकल्पातून अत्यंत लाभदायी निष्पत्ती निर्माण होईल, असे आम्हाला वाटते.”

गंगाजेन बायोटेक्नोलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष आणि इग्नाइट लाइफ सायन्स फाउंडेशनच्या वैज्ञानिक सल्लागार मंडळाचे सदस्य डॉ. टी. एस बालगणेश म्हणाले, "प्रतिजैविक प्रतिकार ही समस्या आपण आत्तापर्यंत आधुनिक वैद्यकशास्त्रात मिळवलेले सर्व यश पुसून टाकण्याच्या बेतात आहे. मानववंश टिकवायचा असेल, तर ‘सर्वांसाठी आरोग्य’ ह्या संकल्पनेचा भाग म्हणून ही जागतिक व स्थानिक समस्या सोडवण्यासाठी नवीन उपचार तातडीने शोधणे आवश्यक आहे. एएमआर हा भारताच्या जी-20 अध्यक्षतेखाली प्राधान्याचे क्षेत्र आहे.  संशोधनासाठी निधी, जागरूकता आणि सावधपणे उचललेली पावले ह्यांच्या माध्यमातून सामूहिक प्रयत्न केल्यास आपण या संभाव्य ‘साथी’विरोधात प्रभावीपणे लढू शकू.”

एएमआरच्या क्षेत्रातील चांगल्या कल्पनांना प्रत्यक्षात आणण्यासाठी व्यासपीठ मिळेल आणि त्यांवर उद्योगक्षेत्रातील भागीदार व सहयोगींद्वारे काम केले जाईल याची निश्चिती करणारी सहाय्यकारी यंत्रणा म्हणून तसेच प्रारंभिक मूल्यमापन करणारी यंत्रणा म्हणून केएमसीसीचा सीएसआर प्रकल्प काम करेल. 

कोटक महिंद्रा समूहातील कोटक कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) शाखा ही कोटक कर्मा म्हणून ओळखली जाते.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight