इफ्को..

इफ्कोच्या पुढाकाराने 128 वर्षात प्रथमच इंटरनॅशनल कोऑपरेटिव अलायन्सची सर्वसाधारण सभा भारतात होणार

इफ्कोने जागतिक सहकार व्यासपीठावर नेतृत्वाची भूमिका घेतल्यामुळे ‘सहकार से समृद्धी’ हे तत्त्व वैश्विक होत आहे

जगातील पहिल्या क्रमांकाची सहकारी संस्था म्हणून इफ्को देशाच्या आर्थिक वाढीत लक्षणीय योगदान देत आहे आणि सहकार से समृद्धी हे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत करत आहे

नवी दिल्ली, 28 जून, 2023: इफ्कोच्या प्रयत्नांमुळे भारतीय सहकार क्षेत्राने एक ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. इंटरनॅशनल कोऑपरेटिव अलायन्सच्या मंडळाने आयसीए ग्लोबल बोर्डाची सर्वसाधारण सभा तसेच एक आंतरराष्ट्रीय परिषद 128 वर्षांमध्ये प्रथमच भारतात घेण्याचा निर्णय एकमताने केला आहे. भारतात नवी दिल्ली येथे जून 2024 मध्ये ही बैठक होणार आहे. जगभरातील 107 देशांतील 310हून अधिक सहकारी संस्थांचे प्रतिनिधीत्व आयसीए करते. ह्या संघटनेची महत्त्वाची बैठक भारतात घेण्याचा प्रस्ताव इफ्कोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. यू. एस. अवस्थी ह्यांनी ब्रुसेल्स येथे झालेल्या आयसीए बोर्डाच्या बैठकीत मांडला आणि आयसीए बोर्डाने एकमताने हा प्रस्ताव मंजूर केला. माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी ह्यांच्या ‘सहकार से समृद्धी’ या उद्दिष्टापासून प्रेरणा घेत तसेच भारत सरकारचे पहिले माननीय सहकारमंत्री श्री. अमित शहा ह्यांच्या बहुआयामी नेतृत्वाखाली इफ्कोने जागतिक सहकार चळवळीवर आपला ठसा उमटवला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर इफ्कोने उत्तम कामगिरी करणे हे देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासाच्या दृष्टीनेही मोठे पाऊल आहे. 

सहकार क्षेत्रातील ह्या भव्य आंतरराष्ट्रीय समारंभामध्ये, आयसीएचे सदस्य असलेल्या जगभरातील सहकारी संस्थांचे नेते सहभागी होतील आणि आपल्या अनुभवांचे आदानप्रदान करतील, नवीन सहयोगांवर चर्चा करेतील तसेच संस्थांशी निगडित महत्त्वपूर्ण निर्णय घेतील. आयसीए सर्वसाधारण सभा हा सहकारी संस्थांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा समारंभ असतो. कारण, संस्थांमधील लोकशाही तत्त्वे व एकजुटीचे दर्शन ह्यातून घडते. 

इफ्कोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. यू. एस. अवस्थी म्हणाले, “आयसीए सर्वसाधारण सभा आणि आंतरराष्ट्रीय परिषदेचे यजमानपद भूषवण्याची संधी मिळणे हा इफ्को व भारतातील सहकारी व्यवसायांसाठी अभिमानाचा क्षण आहे. भारतातील सहकार क्षेत्रातील आम्हा सर्वांसाठी हे मोठे यश आहे. ह्यामुळे सहकार क्षेत्रात अनेक नवीन संधी खुल्या होतील. भारतीय सहकारी संस्था जागतिक व्यवसायांशी सहयोग करू शकतील, त्यांत सहभागी होऊ शकतील.” 

देशभरातील शेतकऱ्यांच्या वाढीसाठी व विकासासाठी तसेच देशातील दुर्गमातील दुर्गम भागात भारतीय सहकार चळवळ बळकट करण्यासाठी इफ्को कायमच बांधील आहे. इफ्को गेल्या अनेक वर्षांपासून आंतरराष्ट्रीय सहकार क्षेत्रात भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी करत आहे. 

आयसीएच्या वर्ल्ड कोऑपरेटिव मॉनिटरद्वारे इफ्कोला जगभरातील 300 सहकारी संघटनांमधून क्रमांक 1 देण्यात आला आहे. अलीकडेच इफ्कोने इफ्को नॅनो युरिया लिक्विड आणि इफ्को नॅनो डीएपी लिक्विड जगातील पहिले नॅनो फर्टिलायजर (खत) विकसित केले. रासायनिक खतांचा वापर कमी करणे आणि पिकांची उत्पादनक्षमता वाढवणे ह्या उद्देशाने विकसित करण्यात आलेली ही खते म्हणजे शाश्वत शेतीच्या दिशेने टाकलेले मोठे पाऊल आहे. माननीय पंतप्रधानांची ‘आत्मनिर्भर भारत’ व ‘आत्मनिर्भर कृषी’ ही उद्दिष्टे डोळ्यापुढे ठेवून इफ्कोने नॅनो युरिया विकसित केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि शाश्वत शेतीच्या दिशेने वाटचाल करता येईल.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight