ऐतिहासिक स्वरुपाच्या राष्ट्रीय आमदार परिषदेस सुरुवात

ऐतिहासिक स्वरुपाच्या राष्ट्रीय आमदार परिषदेस सुरुवात 

मुंबई, भारत - जून १५,२०२३: भारत देश सध्या आपल्या लोकशाहीचे बळकटीकरण करण्याच्या दिशेने प्रवास करत आहे. या अद्भुत प्रवासाची एक अविस्मरणीय सुरुवात करण्याच्या हेतूने आयोजित 

राष्ट्रीय आमदार परिषद भारत ( एनएलसी भारत) या राष्ट्रीय परिषदेस आज सुरुवात झाली. या परिषदेत देशभरातून तब्बल २००० हून अधिक आमदार सहभागी झाले असून, अनेक आमदार आपली पक्षीय रेषा ओलांडून या परिषदेत सहभाग घेत आहेत. ही परिषद मुंबई येथील जिओ वर्ल्ड कंवेंशन सेंटर येथे होत आहे. 

पुढील तीन दिवसांत, प्रतिष्ठित मान्यवर, तज्ज्ञ आणि आमदार आपल्या लोकशाही मूल्यांना बळकट करण्याच्या उद्देशाने चर्चा करतील. या चर्चांमध्ये दहा विषयासंबंधी समांतर सत्रांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामध्ये वरिष्ठ सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली 50 आमदार हे संबंधित विषयांचा सखोल अभ्यास करतील.

याव्यतिरिक्त, परिषदे दरम्यान आयोजित सहा गोलमेज सत्रे ही राजकीय नेते, आध्यात्मिक व्यक्ती, व्यवसाय आणि उद्योगातील नेते आणि कायदेशीर दिग्गजांना विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करतील. उद्घाटन कार्यक्रमासह पूर्ण सत्रांमध्ये सर्व सहभागी उपस्थित असतील. विशेष म्हणजे, ‘टेल ऑफ द टॉल’ या सत्रात व्यंकय्या नायडू आणि शरद पवार यांसारखे आदरणीय नेते उपस्थित असतील, जे समारोपाच्या कार्यक्रमात  निरनिराळ्या राज्यांतील आमदारांना मार्गदर्शन करतील.

या परिषदेत भारतीय स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष ही संकल्पना प्रतिबिंबित करणारे आणि लोकशाहीच्या भावनेला साजरे करणाऱ्या एपीजे अब्दुल कलाम या एक्स्पोसाठी स्वतंत्र पॅव्हेलियन असणार आहे. या एक्स्पोमध्ये "मतदारसंघ विकासासाठी निवडक 75 आमदारांच्या प्रशंसनीय कार्य", "ग्रासरूट डेव्हलपमेंटसाठी कार्यरत असलेले 75 प्रशंसनीय स्टार्टअप", "राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे 75 प्रशंसनीय कार्यक्रम", "जगातील इतर लोकशाही देशांमधील 75 प्रशंसनीय लोकशाही पद्धती"आणि "जगभरातील 75 प्रशंसनीय लोकशाही-आदर्श." यांचा समावेश असणार आहे. 

परिषदेत दुसऱ्या दिवशी अर्थात १६ जून २०२३ रोजी " रॅम्प ऑफ डेमोक्रसी" या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  आदरणीय पद्मश्री पुरस्कार विजेत्या आणि प्रसिद्ध पार्श्वगायिका, उषा उथुप हे या कार्यक्रमाचे संचालन करतील. या कार्यक्रमा दरम्यान, सहभागी आमदार हे त्यांच्या वांशिक पोशाखाद्वारे प्रदर्शन करतील, जे आपल्या राष्ट्राच्या विविध संस्कृती आणि मूल्यांचे प्रतिनिधित्व करतील.

आपल्या स्वागतपर भाषणात महाराष्ट्र विधानसभेचे माननीय अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी संसदीय लोकशाहीचा पाया मजबूत करण्यासाठी विधायक चर्चा आणि विविध सत्रांच्या महत्त्वावर भर दिला. या परिषदे दरम्यान मिळालेल्या माहितीमुळे राज्याच्या विधानसभांचे भवितव्य घडण्यास आणि राज्य व राष्ट्रीय स्तरावरील सुशासनाला हातभार लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या माननीय उपसभापती श्रीमती. नीलम गोर्‍हे यांनी विधानसभेचे आदरणीय अध्यक्ष, विद्यमान आणि माजी  लोकसभा अध्यक्ष यांना एकाच ठिकाणी एकत्र आणणे ही एक उल्लेखनीय कामगिरी आहे असे सांगत,  हे आव्हान स्वीकारल्याबद्दल  एमआयटी-एसओजी आणि राहुल कराड जी यांचे कौतुक केले.

परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी एनएलसी भारतच्या पॅट्रोन अर्थात आश्रयदाता यांनी आमदारांचे स्वागत केले. लोकसभेच्या माजी अध्यक्षा पद्मभूषण श्रीमती सुमित्रा महाजन यांनी एनएलसी भारत'चे संयोजक राहुल कराड यांच्या दूरदृष्टीकोनाचे कौतुक केले. तसेच पक्षपाती राजकारणाच्या पलीकडे जाऊन संपूर्ण राष्ट्राच्या प्रगतीसाठी वैयक्तिक राज्यांच्या प्रगतीवर भर देण्याचा सल्ला दिला. लोकसभेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील यांनीही राहुल कराड यांनी संमेलनाच्या आयोजनासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल अभिनंदन केले.

एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटने भारतीय छात्र संसदच्या सहयोगाने ही परिषद आयोजित केली आहे. या परिषदेचे  उद्दिष्ट हे आमदारांना सक्षम करणे, त्यांच्यातील परस्पर सहकार्य वाढवणे आणि आपली लोकशाही मजबूत करणे हे आहे. सुशासन आणि लोकशाही मूल्यांच्या बळकटीकरणाद्वारे विधिमंडळाची स्वायत्तता वाढवणे हे या परिषदेचे प्राथमिक लक्ष आहे.

बॉक्स:  विस्तृत वादविवादासाठी निश्चित करण्यात आलेल्या १० संकल्पना 

- थीम 1:  मतदारसंघ विकसित करण्याचे कलाकौशल्य

- थीम 2: शाश्वत विकासाची साधने आणि त्यांचा प्रभाव

- थीम 3: कल्याणकारी योजना: विकास साखळीतील अगदी शेवटच्या व्यक्तीपर्यंत या योजनांचा विस्तार

- थीम 4: सामाजिक विकासासाठी सहयोग: नोकरशहा आणि आमदार

- थीम 5: आर्थिक कल्याणसाठी तंत्रज्ञानाचा अवलंब

- थीम 6: काम आणि जीवन यांच्यातील संतुलन: यशाची गुरुकिल्ली

- थीम 7: सार्वजनिक जीवनातील तणाव व्यवस्थापन

- थीम 8: तुमची प्रतिमानिर्मिती - साधने आणि तंत्रे

- थीम 9: विधान कार्यप्रदर्शन - अपेक्षपूर्ती 

- थीम 10: प्रशंसनीय विधान पद्धती

बॉक्सः ६ राऊंडटेबल चर्चा - दिवस १ ला - १६ जून

-  भारत @२०४७: आमचे ध्येय - सर्वपक्षीय नेत्यांसोबत राऊंड टेबल चर्चा 

- राजकारणाचे अध्यात्मिकरण: सर्वधर्मीय धर्मगुरूंसोबत राऊंडटेबल चर्चा

- अमृत कालमध्ये भारताचे परिवर्तन - व्यापार-उद्योगातील नेत्यांसोबत राऊंडटेबल चर्चा

- विधिमंडळाचे कामकाज: आव्हाने आणि पुढील मार्ग - सर्व राज्य विधानमंडळांच्या सचिवांची राऊंडटेबल चर्चा

बॉसः दिवस २ रा- १७ जून 

- भारत @२०४७: आमचे ध्येय - सर्वपक्षीय नेत्यांसोबत राऊंड टेबल चर्चा 

- कायदे आणि नागरिक@२०४७ : आमचे ध्येय

- कायदेतज्ज्ञांची राऊंड टेबल चर्चा

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..