माजी सैनिकांना रोजगार संधी मिळवून देण्यासाठी कोटक लाईफ आणि डीजीआर यांच्यात करार
नवी दिल्ली, 13 जून 2023: कोटक महिंद्रा लाईफ इन्शुरन्स कंपनी (कोटक लाईफ) च्या वतीने डायरेक्टोरेट जनरल रिसेटलमेंट (डीजीआर) यांच्या समवेत आज एका सामंजस्य करार (एमओयु)वर स्वाक्षरी करण्यात आली. या करारामार्फत, आंतरसेवा संघटना थेट माजी-सैनिक कल्याण विभाग (संरक्षण मंत्रालय) अंतर्गत काम करणार असून संरक्षण सेवांसाठी माजी-सैनिकांना रोजगार संधी उपलब्ध करून घेण्यात येतील.सामंजस्य करारानुसार, कोटक लाईफ अनेक वितरण मंचांवर नोकऱ्या देऊन कंपनी आणि तिच्या संलग्न कंपन्यांमध्ये विविध भूमिकांसाठी माजी सैनिकांची नियुक्ती करेल.
हा उपक्रम कोटक लाईफच्या भरती धोरणाशी संरेखित आहे. ज्यामुळे विविधतेला चालना मिळते आणि ज्यांनी आपल्या देशाची सेवा आणि संरक्षण करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले आहे अशा शिस्तप्रिय, मेहनती आणि लवचिक व्यक्तींच्या अफाट क्षमतेचा फायदा घेता येतो.
मेजर जनरल शरद कपूर, वायएसएम, एसएम, डायरेक्टर जनरल रिसेटलमेंट म्हणाले, “कोटक लाईफसोबतची आमची भागीदारी कॉर्पोरेट क्षेत्रातील आमच्या माजी सैनिकांची दृश्यमानता वाढवते आणि कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यात त्याचप्रमाणे त्यांना एक सन्माननीय करिअरची दुसरी संधी प्रदान करण्यात मदत करते.
कोटक महिंद्रा लाईफ इन्शुरन्स कंपनी’चे व्यवस्थापकीय संचालक महेश बालसुब्रमण्यम म्हणाले, “या उपक्रमाद्वारे, आमच्या देशाची सेवा आणि संरक्षण करणाऱ्या आमच्या माजी सैनिकांच्या वीरांच्या सेवेची कबुली देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. जीवन विमा संरक्षणाद्वारे देशाची सेवा सुरू ठेवण्याचा प्रस्ताव देत आमच्या सशस्त्र दलातील कर्मचार्यांच्या कौशल्यांचा आणि समर्पणाचा लाभ घेण्याचा या भागीदारीचा उद्देश आहे. हे सहकार्य सेवानिवृत्त माजी सैनिकांना त्यांच्या गावी त्यांच्या कुटुंबियांच्या जवळ राहून काम-जीवन संतुलन राखण्यास सक्षम करेल.”
Comments
Post a Comment