५१ वर्षीय व्यक्तीच्या पित्ताशयातून काढला ८ सेमीचा खडा
५१ वर्षीय व्यक्तीच्या पित्ताशयातून काढला ८ सेमीचा खडा
लठ्ठपणा, विशिष्ट प्रकारचे आहार यासारख्या घटकांमुळे भारतीयांमध्ये पित्ताचे खडे होण्याची शक्यता अधिक
नवी मुंबई, १५ जून २०२३:- नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सच्या डॉक्टरांनी ५१ वर्षीय व्यक्तीच्या पित्ताशयातून ८ सेमीचा खडा यशस्वीरित्या काढला. रुग्णाला ३-४ महिन्यांपासून अस्वस्थता जाणवत होती व सतत वेदना आणि ओटीपोट फुगण्याची तक्रार होती. तसेच अनेक आरोग्यसेवा व्यावसायिकांचा सल्ला घेतला मात्र आराम मिळाला नाही. नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सचे लॅपरोस्कोपिक आणि रोबोटिक शस्त्रक्रियेचे सल्लागार डॉ. नितीश झावर यांनी पुढील मूल्यमापन केल्यामुळे मोठ्या प्रमाणात पित्ताशयाचा खडा असल्याचे निदान झाले.
पित्तामध्ये जास्त कॉलेस्ट्रॉल, जास्त बिलीरुबिन असल्यास किंवा पुरेसे पित्त क्षार नसल्यास पित्ताचे खडे तयार होऊ शकतात. पित्तामधील या बदलांचे कारण संशोधकांना पूर्णपणे समजलेले नाही. जर पित्ताशयाची पिशवी पूर्णपणे रिकामी होत नसेल तर पित्ताचे खडे तयार होऊ शकतात. लठ्ठपणा आणि विशिष्ट प्रकारचे आहार यासारख्या जोखीम घटकांमुळे काही लोकांमध्ये पित्ताचे खडे होण्याची शक्यता इतरांपेक्षा जास्त असते. उपचार न केल्यास, पित्ताचे खडे वाढू शकतात आणि त्यांची कर्करोगाच्या रुपात वाढ होण्याची शक्यता असते. ते सामान्य पित्त-नलिकामध्ये देखील प्रभावित होऊ शकतात, ज्यामुळे कोलेडोकोलिथियासिस, पित्ताशयाचा दाह आणि स्वादुपिंडाचा दाह यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. लक्षणे ठळकपणे न दिसल्यामुळे पित्ताशयाच्या कर्करोगाचे आव्हान निर्माण होऊ शकते आणि निदान करायला विलंब झाल्यास परिणामी रोगाचे खराब पूर्वनिदान दिसून येतात आणि आयुर्मान कमी होऊ शकतो.
डॉ. नितीश झावर, सल्लागार, लॅपरोस्कोपिक-रोबोटिक शस्त्रक्रिया, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई म्हणाले, "भारतात पित्ताशयाच्या शस्त्रक्रियेबद्दल अनेक गैरसमज पसरले आहेत. काही लोकांना असं वाटतं की लक्षणीयरित्या लक्षणे दिसत नसतील तर शस्त्रक्रियेची गरज नसते. काहींचा असा समज आहे की शस्त्रक्रियेमुळे पचनसंस्थेला कायमचे नुकसान होऊ शकते आणि काहींना तर आर्थिक अडचणींमुळे शस्त्रक्रिया करता येत नाही. या प्रचलित गैरसमजांमुळे रुग्णसुद्धा सुरुवातीला शस्त्रक्रिया करण्यास टाळाटाळ करत होता. मात्र अखेर रुग्णाने संमती दिली आणि लॅपरोस्कोपिक प्रक्रिया करण्यात आली. सामान्यतः पित्ताच्या खड्यांचा आकार लहान दाण्याएवढा असतो. शस्त्रक्रियेदरम्यान आम्हाला ८ x ८ सेमी २ आणि ८४० मिलीग्राम एवढा पित्ताचा खडा सापडला."
भारतात पित्ताशयाच्या खड्यांचे प्रमाण ६.१२% (पुरुषांमध्ये ३% आणि स्त्रियांमध्ये ९.६%) आहे. तर काही व्यक्तींमध्ये लक्षणे दिसून येत नाहीत, जोपर्यंत गंभीर लक्षणांमुळे दैनंदिन कामकाजावर लक्षणीय परिणाम होत नाहीत, तोपर्यंत अनेक प्रकरणांचे निदान होत नाही. रुग्णाला लक्षणात्मक उपचारांमुळे आराम मिळत नसल्याने आणि कालांतराने लक्षणे वाढू लागल्याने तात्पुरते कावीळचे निदान करण्यासाठी सर्वसमावेशक तपासणी करण्यात आली. अल्ट्रासोनोग्राफी (यूएसजी) द्वारे पुढील मूल्यमापन केल्यामुळे ८ सेमी एवढ्या मोठ्या पित्ताशयातील खडा असल्याचे निश्चित निदान करता आले. लॅपरोस्कोपिक पद्धतीने रुग्णाच्या पित्ताशयातील खडा काढून टाकण्याचा सल्ला देण्यात आला.
Comments
Post a Comment