कोटक लाइफ इन्शुरन्स..
कोटक लाइफ इन्शुरन्सतर्फे स्वर्गीय रतीलाल देवीजी चौहान चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने स्तनांच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी उपक्रमाचे आयोजन
पालघर, 25 जून 2023 – कोटक महिंद्रा लाइफ इन्शुरन्स कं. लि. ने (कोटक लाइफ) आपल्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) उपक्रमाअंतर्गत आज स्वर्गीय रतीलाल देवीजी चौहान चॅरिटेबल ट्रस्टला (एलआरडीसीसीटी) मोबाइल मेडिकल व्हॅन पुरवत असल्याची घोषणा केली. स्तनांच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी ही मोबाइल मेडिकल व्हॅन खास तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये एआय बेस्ड थर्मालिटिक्स स्क्रीनिंग मशिन्स बसवण्यात आले असून त्यामुळे पालघर जिल्हा व आसपासच्या परिसरातील वंचित स्त्रियांना मदत होईल.
या मोबाइल मेडिकल व्हॅनचे उद्घाटन डॉ. उज्ज्वला काळे, महापौर, पालघर जिल्हा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ. राजेंद्र चौहान, स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ, एलआरडीसीसीटी आणि डॉ. मनिष रांगणेकर, वरिष्ठ उपाध्यक्ष, कोटक महिंद्रा लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड उपस्थित होते.
स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत असून या उपक्रमामुळे स्त्रियांमध्ये त्याचे वेळेवर निदान व उपचार होण्यास मदत होईल. कोटक लाइफच्या सीएसआर उपक्रमाअंतर्गत एलआरडीसीसीटीद्वारे नो टच तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. हे तंत्रज्ञान थर्मालिटिक्स मशिनचा वापर करते, ज्यामध्ये कम्प्युटरवर चालणाऱ्या डायग्नॉस्टिक इंजिनच्या मदतीने थर्मल व्हेरिएशन्सवरून स्तनातील गाढ शोधली जाते. या व्हॅनमधील कर्मचारीवर्गात पूर्णपणे स्त्रियांचा समावेश असून टेस्टदरम्यान स्त्रियांना सुरक्षित वाटेल याची काळजी घेतली जाईल. त्याशिवाय रेडिओलॉजिस्टच्या बाह्य सेवेचीही मदत घेतली जाणार आहे. निदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एलआरडीसीसीटीतर्फे रुग्णांना गरजेनुसार अधिक माहिती व उपचारांसाठी तज्ज्ञांची शिफारस केली जाईल.
कोटक लाइफने आपल्या सीएसआर उपक्रमाअंतर्गत स्तनांच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी पुरवलेली ही दुसरी मोबाइल मेडिकल व्हॅन आहे. यापूर्वी मार्च २०२३ मध्ये कोटक लाइफने नाना पालकर स्मृती संघ (एनपीएसएस) यांच्या सहकार्याने मुंबई व जवळपासच्या जिल्ह्यातील वंचित स्त्रियांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी अशा स्वरुपाची मोबाइल मेडिकल व्हॅन पुरवली होती.
कोटक महिंद्र लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक महेश सुब्रह्मण्यम म्हणाले, ‘स्वर्गीय रतीलाल देवीजी चौहान चॅरिटेबल ट्रस्टला मदत करताना आम्हाला आंद होत आहे. या ट्रस्टद्वारे वंचितांना सवलतीच्या दरातील तसेच मोफत आरोग्य सेवा वंचितांपर्यंत पोहोचवण्यासाठी अविरतपणे प्रयत्न केले जात आहेत. सीएसआर उपक्रमांचा एक भाग म्हणून कोटक लाइफ महत्त्वाच्या आजारांसंदर्भात नागरिकांना मदत करण्यासाठी झटणाऱ्या अशा संस्थांसह काम करण्यावर भर देते.’
स्वर्गीय रतीलाल देवीजी चौहान चॅरिटेबल ट्रस्टचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र आर चौहान म्हणाले, ‘कोटक लाइफने निधी उपलब्ध करून दिलेल्या निरामयच्या आधुनिक डिजिटल थर्मालिटिक्स तंत्रज्ञानाच्या मदतीने स्तनांच्या कर्करोगाचे निदान पालघरमधील ग्रामीण भागात राहाणाऱ्या स्त्रियांसाठी वरदान ठरेल. कित्येत स्त्रियांना त्रास सहन करावा लागत आहे, मात्र त्यासाठी काय करावे हे त्यांना माहीत नाही. या उपक्रमामुळे त्यांना गाठ किंवा कर्करोगाचे वेळेवर निदान होण्यास मदत होईल. कोटक लाइफने हाती घेतलेला हा प्रकल्पा समाजहिताचा आणि दुर्गम भागातील स्त्रियांपर्यंत पोहोचून मदत करणारा आहे. ’
कोटक कर्मा हा कोटक महिंद्रा समूहाचा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) विभाग आहे.
Comments
Post a Comment