परततोय लावणीचा महामंच "ढोलकीच्या तालावर" कलर्स मराठीवर!..

 परततोय लावणीचा महामंच "ढोलकीच्या तालावर" कलर्स मराठीवर!

१ जुलै पासून शनि - रवि रात्री ९. ० वा.

मुंबई 22 जून, २०२३ : कला आणि संस्कृतीचं माहेर घर म्हणजे महाराष्ट्र. विविध कला, संस्कृती आणि साहित्याचा देदीप्यमान वारसा महाराष्ट्राला लाभला आहे. महाराष्ट्राच्या नृत्यकलेची ओळख आणि लोकसंस्कृतीचे वैशिष्ट्य म्हणजे "लावणी". मोठ्या डौलाने लावणी आजही रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते आहे. कलर्स मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम ज्याने  महाराष्ट्राच्या कला संस्कृतीचा एक अविभाज्य भाग असलेल्या लावणी या नृत्यशैलीला प्रेक्षकांसमोर अनेक वर्षे यशस्वीरीत्या सादर केले आहे. तसेच ज्या कार्यक्रमाच्या प्रत्येक पर्वामध्ये प्रेक्षकांना नेहेमीच लावणी ही नृत्यशैली नाविन्यपूर्ण ढंगात बघायला मिळाली तो कार्यक्रम म्हणजे ‘ढोलकीच्या तालावर’. लावणीचा महामंच परततोय एक नव्या बहारदार पर्वासोबत. सज्ज होतोय लावणीचा महामंच, जिथे थिरकणार आहेत महाराष्ट्रातील आजच्या लावण्यवती. जिथे रंगणार आहे जंगी मुकाबला आणि त्यातूनच महाराष्ट्राला मिळणार आजची लावणी सम्राज्ञी. या पर्वाचे परीक्षक असणार आहेत, अष्टपैलू अभिनेत्री क्रांती रेडकर, सुप्रसिध्द निर्माते, दिगदर्शक आणि लेखक अभिजीत पानसे आणि नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे बिग बॉस मराठी सिझन चौथाचा महविजेता आणि आपल्या सगळ्यांचा लाडका अक्षय केळकर. तेंव्हा नक्की बघा ‘ढोलकीच्या तालावर' १ जुलै पासून शनि आणि रवि रात्री ९.०० वा फक्त कलर्स मराठीवर.

लावणी म्हणजे अदाकारी, नृत्य आणि ताल यांचा त्रिवेणी संगम. याबद्दल उत्तम जाण असणाऱ्या, आपल्या लावणी आणि अदाकारीने परीक्षकांचे मन जिंकलेल्या प्रतिभावान स्पर्धक येत आहेत आपले मन जिंकायला. ढोलकीच्या तालावर कार्यक्रमाच्या नव्या पर्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधून असंख्य मुलींनी आपल्या लावणीचे व्हिडिओ पाठवले, ज्यामधून काही निवडक मुलींनाच या पर्वामध्ये आपली कला संपूर्ण महाराष्ट्रासमोर सादर करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. आम्ही सज्ज आहोत, मंच सज्ज आहे तुमच्या भेटीला.

कार्यक्रमाविषयी बोलताना व्यवसाय प्रमुख, कलर्स मराठी, (वायकॉम18) - अनिकेत जोशी म्हणाले,, "महाराष्ट्रातील प्रेक्षकांची लोककलेविषयीची आवड आणि जाण लक्षात घेता तब्बल पाच वर्षांनंतर आम्ही ढोलकीच्या तालावर हा कार्यक्रम पुन्हाएकदा प्रेक्षकांच्या भेटीस आणण्याचे ठरविले. त्याला अनेक कारणं देखील आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अनेक प्रतिभावान कलाकार आहेत ज्यांना त्यांच्यातील कला दाखविण्याचे व्यासपीठ मिळवून देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे आणि हेच त्यामागील एक महत्त्वाचे कारण आहे. प्रेक्षकांना हा कार्यक्रम नक्कीच आवडेल अशी आम्हाला खात्री आहे”.

कार्यक्रमाविषयी बोलताना प्रोग्रामिंग हेड, कलर्स मराठी, (वायकॉम18) - विराज राजे म्हणाले, "ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमामुळे महाराष्ट्रातील तमाम लोककला प्रेमींशी जोडण्याची आणि ती पुन्हाएकदा नव्या ढंगात प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याची उत्तम संधी हा कार्यक्रम देतो असे मला वाटते. लावणी नृत्याची आवड असणाऱ्या प्रेक्षकांनासाठी ही एक पर्वणीचं असेल. आपल्या लोककलेचा अविभाज्य भाग असलेल्या लावणीला पुन्हा तो मान सन्मान मिळून देण्यासाठी हा महामंच आहे, सध्याच्या काळात हा लोप होत असल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे. या पर्वातील स्पर्धकांमध्ये असलेली उत्कृष्ट दर्जाची प्रतिभा पाहून प्रेक्षक नक्कीच प्रभावित होतील. लावणी फक्त सादर होणार नसून ती वेगवेगळ्या प्रकारे सादर करण्याचा स्पर्धकांचा प्रयत्न असेल आणि त्याचसोबत प्रेक्षकांसाठी काही सरप्राइज देखील आम्ही राखून ठेवले आहेत ते हळूहळू त्यांच्यासमोर येतीलच. या कार्यक्रमामध्ये स्पर्धकांना मार्गदर्शन करण्यासाठी अभिजीत पानसे, क्रांती रेडकर आणि आशिष पाटील यांसारखे परीक्षक असणार आहेत. सर्व स्पर्धकांना आमच्याकडून खूप शुभेच्या आणि हे पर्व नक्कीच नृत्याचा अविस्मरणीय प्रवास ठरेल अशी मला आशा आहे”.

या कार्यक्रमानिमित्त बोलताना परीक्षकांनी देखील आपली मते मांडली, सुप्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर म्हणाली, मी खूप उत्सुक आहे मी कार्यक्रमाचा भाग आहे. कारण कुठेतरी नृत्य ही  माझ्या हृदयाच्या खूप जवळची अशी गोष्ट आहे. त्यामुळे येणारे जे स्पर्धक आहेत त्यांची तयारी बघण्यात आणि त्यांच्याबरोबरचा प्रवास त्यांच्यासोबत साध्य करण्यात माझा कल जास्त आहे. मी जरी परीक्षकाच्या भूमिकेत असले तरीदेखील मी त्यांची सपोर्टर असेन. त्या खुर्चीवर मला एक माणूस म्हणून बसायला जास्त आवडेल जेव्हा त्यांना माझी गरज असेल तेव्हा मी तिथे कायम असेन. मी स्वत: कथ्थक नृत्यांगना असल्याने  अदाकारी, क्लासिकलची बाजू, टेक्निकल गोष्टींकडे देखील मी लक्ष ठेवणार आहे. सांस्कृतिकदृष्ट्या समृध्द असा हा कार्यक्रम आम्ही प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहोत मला खात्री आहे तुम्हाला देखील आवडेल.”

नृत्य दिगदर्शक आशिष पाटील म्हणाला, "एक सामान्य माणूस ते इथपर्यंतचा प्रवास खूपच सुंदर आणि खूप काही शिकवणारा होता आणि अजूनही आहे. एक कलाकार, मग एक स्पर्धक, मग कोरिओग्राफर, ते आज परीक्षक हा प्रवास हा फक्त एक स्वप्नवत क्षण आहे. लोककला प्रकार (लावणी) ला गेले १८ वर्षांपासून मी जपून ठेवले आहे जितका आनंद तो सादर करताना होतो तितकाच परीक्षकाच्या खुर्चीत बसून देखील होतो आहे. ज्या शोचा मी सलग २ सीझनचा विजेता कोरिओग्राफर ठरलो आज त्याच शोचा मी परीक्षक आहे, ही माझ्यासाठी खुप मोलाची आणि अभिमानाची बाब आहे".

निर्माते, दिगदर्शक आणि लेखक, अभिजीत पानसे म्हणाले, "जेव्हा मला या कार्यक्रमाबद्दल विचारणा झाली तेव्हा मला गंमत वाटली कारण माझा शास्त्रीय नृत्याचा काही अभ्यास नाही. नृत्याशी माझा संबंध हा फक्त मिरवणुकी पर्यंतच. मला सांगण्यात आले एका दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला कसं वाटलं त्याच्यासाठी आम्हाला एक दिग्दर्शक हवा आहे. त्यामुळे मी स्वतः खूप उत्सुक आहे परीक्षण करण्यासाठी...टेलिव्हिजन कार्यक्रमामध्ये अश्याप्रकरचे परीक्षण मी आयुष्यात पहिल्यांदाच करणार आहे. ज्या नृत्यांगना आहेत त्यांच्याकडून माझी एक अपेक्षा आहे की, मी नेहेमी असं म्हणतो एखादं नृत्य करत असताना त्या गाण्याचे बोल, त्याचा अर्थ समजून ते सादर करणे खूप महत्वाचे आहे. आणि तसं केलं तर तुम्हाला त्या नृत्याची उंची गाठता येते. मला असं मनापासून वाटतं की, निवडलेल्या नृत्यांगना या तुफान आहेत आणि आम्हाला परीक्षण करणे जरा कठीणच होऊन बसणार आहे. लावणी ही अतिशय पूर्वीपासून चालत आलेली नृत्यशैली आहे. लावणी हा महाराष्ट्रातील एक उच्च दर्जाचा कलाप्रकार आहे. मला असं आवर्जून सांगायचं आहे, लावणी सादर करणं म्हणजे नुसतं नाच करणं नव्हे तर तालाची समज असणे, त्याला अभिनयाची जोड असणे आणि तो माहोल उभा करणे हे खूप कष्टाचे काम आहे. लावणी दिसायला जरी सोपी वाटत असली तरीदेखील करायला तितकीच अवघड आहे. ती बघायला मीच नव्हे तर अवघा महाराष्ट्र उत्सुक असेल याची मला खात्री आहे."

कार्यक्रमाचा सूत्रसंचालक अक्षय केळकर म्हणाला, "मला वाटतं कलर्स मराठीशी माझं वेगळंच एक नातं आहे. जसे चाकरमानी कोकणासाठी आसुसलेले असतात तसा मी ही माझ्या घरात म्हणजे मराठी माणसांमध्ये ओळख व्हावी यासाठी आसुसलेलो. आणि मला बिग बॉस मराठीची संधी मिळाली आणि एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं वाटलं. कलर्स मराठीने माझ्या portfolio मध्ये दोन नवीन शब्द भरले - रिॲलिटी शो आणि दुसरा म्हणजे Host! बिग बॉस मराठीने ते सारं काही दिलं ज्यासाठी मी इतकी वर्ष वाट पाहिली. बिग बॉस ने ओळख तर दिलीच आणि आता पहिल्यांदाच host म्हणून मी तुमच्याशी जोडला जाणार आहे. लावणी म्हटली की ढोलकीच्या तालावर हा शो डोळ्यासमोर येतोच. ढोलकीच्या तालावर सारख्या एका खूप मोठ्या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक म्हणुन मी आता तुम्हाला भेटणार आहे. कमाल excitement, खूप कमाल प्रेम आणि आपुलकी आणि थोडीशी भीती सगळ काही घेऊन पुन्हा या मंचावर उभा राहणार आहे आणि तुमचं माझ्यावरच प्रेम असच असूद्या, आणि याहून ही जास्तच असू द्या" !

तेंव्हा बघायला विसरू नका ‘ढोलकीच्या तालावर' - लावणीचा महामंच १ जुलै पासून शनि आणि रवि रात्री ९.०० वा फक्त कलर्स मराठीवर.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..