कलर्स मराठीवर एकत्र आल्या 'सावित्री', केली वटपौर्णिमा साजरी ..

कलर्स मराठीवर एकत्र आल्या 'सावित्री', केली वटपौर्णिमा साजरी 

वटपौर्णिमा हा हिंदू संस्कृतीतील एक महत्वाचा सण मानला जातो. या दिवशी महिलांनी वटवृक्षाची पूजा केल्यास  नवऱ्याची आयु वाढते, असे मानले जाते. 

कलर्स मराठी नेहमीच आपल्या प्रेक्षकांना उत्तम गुणवत्ता असलेल्या मालिका भेट देत असून नेहमीच रसिकांचे मनोरंजन करत आली आहे.  ही वाहिनी नेहमीच रसिकांसाठी काहीतरी हटके घेऊन येत असते. हीच परंपरा आपल्या लाडक्या कलर्स मराठीने देखील जोपासली असून नुकताच कलर्स मराठीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर वटपौर्णिमाचा खास व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला आहे. हा व्हिडिओ तुम्ही इंस्टाग्राम, यूट्यूब आणि फेसबुकवर पाहू शकता.

या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, 'इंद्रायणी' या मालिकेमधून शकुंतला वडाच्या झाडाला कुंकू लावतेय, तर झाडामागून 'अंतरपाट' मालिकेतील गौतमी हातात धागा घेऊन क्षितिजसोबत सुरु होणाऱ्या नव्या संसाराचे सुख मागत आहे. दुसरीकडे  'अबीर गुलाल' मालिकेतील श्रीची आई वडाच्या झाडामागून येताना दिसत असून 'रमा -राघव' मालिकेतून रमा कुटुंब जोडताना मिळणारी राघवची अतूट साथ सात जन्म राहू देत असे म्हणत आहे. 'पिरतीचा वनवा उरी पेटला ' या मालिकेतून सावी अर्जुनची साथ मागत आहे. तर, सुख कळले या मालिकेतून  मिथिला तिच्या सुखी संसारासाठी प्रार्थना करत आहे.कलर्स मराठीच्या  प्रत्येक मालिकेत सध्या वटपौर्णिमेचा खास ट्रॅक सुरु आहे. 'इंद्रायणी' या मालिकेत तुम्ही पाहू शकता की , वटपौर्णिमेच्या शुभदिनी शकुंतला पूजेसाठी इंदूला घेऊन जाते. आनंदी या समारंभात इंदूच्या उपस्थितीवर आक्षेप  घेते. परंतु झाडाजवळ साप दिसल्यावर इंदू धैर्याने अधूला जवळ घेत त्याचे सापापासून रक्षण करते.तेच 'पिरतीचा वनवा उरी पेटला' या मालिकेत आपल्याला दिसतंय की , एकीकडे सावी अर्जुनसाठी  वटपौर्णिमेची पूजा करत असून बाच्याला सावीबद्दल भावना निर्माण होत आहेत.
'सुख कळले' या मालिकेत माधव मिथिलाला वचन देतो की, वटपौर्णिमेपर्यंत तो बँकेच्या फसवणुकीमागील खरा गुन्हेगार कोण आहे, हे शोधून काढणार आहे. 

आता तुम्हीही वटपौर्णिमेचा हा ट्रॅक पाहू शकता. कलर्स मराठीने साजरी केलेली खास वटपौर्णिमा फक्त आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही #JioCinema वर.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..