सोनी सबवरील ‘पुष्पा इम्पॉसिबल’..

सोनी सबवरील ‘पुष्पा इम्पॉसिबल’मध्ये आणखी एक ट्विस्ट: आपल्या मुलाचा पिता बापोदरा आहे असा दावा करणाऱ्या महिलेची बापोदराने जिरवली!

मुंबई, जून 20, 2024: सोनी सबवरील ‘पुष्पा इम्पॉसिबल’ ही मालिका पुष्पा (करुणा पांडे) नामक एका धडाडीच्या, आनंदी आणि आशावादी स्त्रीची कहाणी सांगते. मालिकेच्या आगामी भागात दिसेल की, बापोदराच्या मागे मीडियाचा ससेमिरा लागतो, कारण सुजाता (अनुजा शरवत) नावाची एक अज्ञात महिला असा दावा करते की, बापोदरा तिच्या बाळाचा पिता आहे.

आगामी भागांमध्ये सुजाता मीडियासमोर कांगावा करते की बापोदरा तिच्या आणि त्यांच्या मुलासोबत राहात नाही. पुढे हे उघड होते की, आमदार जगताप (शाहरुख सादरी)च्या सांगण्यावरून ती हे नाटक करत असते. जगतापने सुरू केलेली शाळा बापोदराने बंद केल्यामुळे त्याच्यावर सूड उगवण्याचा जगतापचा हा कट असतो. त्यांची योजना उधळून देत बापोदरा सुजाताला सांगतो की, जर तू मला तुझा पती मानत असलीस, तर माझ्याशी लग्न कर. सुजाताला लवकरच पश्चात्ताप होतो आणि मीडियासमोर ती कबूल करते की, दबावाखाली येऊन तिने तो दावा केला होता. बापोदरा निर्दोष आहे.

बापोदराची भूमिका करणारा जयेश भारभाया म्हणाला, “बापोदरा सुज्ञ आहे. आपले पत्ते कसे खेळायचे हे त्याला बरोबर माहीत आहे. सुजाता जेव्हा खोटा दावा करते, तेव्हाच त्याला वास येतो की, काही तरी गडबड आहे. भास्करला एका अपघातात मारल्याचा आळ त्याच्या मुलीवर आल्यामुळे बापोदरा आधीच तणावात आहे. पण, अशा बिकट परिस्थितीतून तो शिताफीने मार्ग काढतो. बापोदरा ही गुंतागुंत कशी  सोडवतो हे आगामी भागांमध्ये दिसेल. सुजाताने केलेल्या दाव्याचे परिणाम आणि मुलीवर ओढवलेल्या संकटाचे निराकरण प्रेक्षकांना बघायला मिळेल.

बघत रहा, ‘पुष्पा इम्पॉसिबल’ फक्त सोनी सबवर, दर सोमवार ते शनिवार रात्री 9:30 वाजता

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..