कार्यालयाबाहेर रंगांची उधळण करत फ्युचर जनराली इंडिया इन्शुरन्सतर्फे सर्जनशील उत्साहासह प्राईड महिना साजरा
कार्यालयाबाहेर रंगांची उधळण करत फ्युचर जनराली इंडिया इन्शुरन्सतर्फे सर्जनशील उत्साहासह प्राईड महिना साजरा
• जनजागृतीचे प्रयत्न वाढवण्यासाठी सर्व सहयोगींना अमंत्रित करून प्राईड उत्सव वेगळ्या उंचीवर नेणे
• तमाशा थिएटरसोबत भागीदारी करून समुदायातील लोकांमधील सृजनशीलतेला वाव देणे
• समुदायातील लोकांसाठी शिक्षण आणि क्षमता विकास करण्यासाठी सर्वसमावेशक कॉर्पोरेट नागरिक नात्याने एफजीआयआय, हमसफर ट्रस्टसोबत भागीदारी
मुंबई, जून 26, 2024: एलजीबीटीक्यूआयए+ समुदायाचा एक बळकट सहकारी या नात्याने आपली भूमिका मजबूत करून, फ्युचर जनराली इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (एफजीआयआय) ने या समुदायातील सर्व सहकाऱ्यांसाठी उत्सवाचे दरवाजे उघडे ठेवून आपल्या प्राईड (पीआरआयडीई) उत्सवाला या वर्षी एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. गेल्या दोन वर्षांपासून कंपनी भारतभरतील आपल्या कार्यालयांमध्ये प्राईड उत्सवाचे आयोजन करत आहेत. आता त्यांनी आपल्या कार्यालयांच्या बाहेर पडून ‘बी-लव्ह्ड’ या समुदायावरील आणि समुदायानेच काम केलेल्या नाटकाचा विशेष प्रयोग करण्यासाठी त्यांनी प्रसिद्ध नाट्यचमू तमाशासोबत करार केला आहे.
केवळ एक सर्वसमावेशक विमा कंपनी आणि नियोक्ताच नव्हे तर एक सर्वसमावेशक कॉर्पोरेट नागरिक या नात्यानेही त्यांच्या संस्कृतीमध्ये डीईआय (वैविध्य, समता आणि सर्वसमावेशकता)चा समावेश करण्याच्या दृष्टीने, एफजीआयआयने महाराष्ट्रातील एलजीबीटीक्यूआयए+ व्यक्तींना शिक्षण आणि कौशल्य-निर्मितीसाठी हमसफर ट्रस्टसोबत भागीदारी केली आहे. त्यांनी 17 लाख रुपयांचा धनादेश हमसफर ट्रस्टकडे सुपूर्द केला. यातून समुदायातील व्यक्तींच्या रोजगार क्षमता वाढवण्यासाठी त्यांना इंग्लिश-स्पिकिंग कोर्स, संगणक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
Comments
Post a Comment