केप्री लोन्स..

केप्री लोन्सतर्फे एमएसएमईसाठी वाजवी दरात सुवर्ण कर्ज उपलब्ध,

प्रती 100 रुपयांमागे दरमहा 99 पैसे व्याजदर

- डिजिटल वितरण आणि परतफेडीच्या पर्यायांसह कर्जाला मंजुरी केवळ 30 मिनिटांत

मुंबई27 जून 2024 – केप्री लोन्स या आघाडीच्या नॉन- बँकिंग फायनान्शियल कंपनीने उद्यम आधारसह व्यवसाय चालकांसाठी वाजवी दरात सुवर्ण कर्ज देणारी योजना तयार केली आहे. मायक्रोस्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेसच्या (एमएसएमईज) वर्किग कॅपिटलच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खास तयार करण्यात आलेल्या या योजनेमध्ये प्रती महिना 100 रुपयांवर केवळ 99 पैसे म्हणजेच प्रती वर्ष 11.88 टक्क्यांचा आकर्षक व्याजदर आकारला जाणार आहे. हा व्याजदर या क्षेत्रातील सर्वात स्पर्धात्मक दर असून त्यात कोणत्याही छुप्या खर्चाचा समावेश नाही.

आर्थिक सर्वसमावेशकतेला चालना देण्याच्या आणि वंचित भागांतविशेषतः दुसऱ्या व तिसऱ्या श्रेणीतील शहरांत कर्ज उपलब्ध करून देण्याच्या हेतूने तयार करण्यात आलेली ही योजना व्यवसाय चालकांना सोयीस्करपणा देणारी आहे. कमीत कमी कागदपत्रांची गरज असलेल्या या योजनेसाठी नागरिक किंवा व्यवसाय चालकांना केवळ केवायसी कागदपत्रे देऊन कर्ज मिळवता येणार आहे. या योजनेअंतर्गत फक्त 30 मिनिटांत कर्ज दिले जाणार असल्यामुळे व्यग्र उद्योजकांसाठी ती आदर्श आहे. त्याशिवाय या योजनेमध्ये टॉप- अप सुविधा आणि नगण्य प्रक्रिया शुल्क समाविष्ट करण्यात आल्यामुळे कर्ज प्रक्रिया सोपी होते. व्यवसाय चालकांना त्यांच्या वापरात नसलेल्या सोन्याच्या मदतीने आणि उद्यम आधार क्रमांक देऊन रोखीचा प्रवाह उंचावता येईल.

केप्री लोन्सचे सुवर्ण कर्ज विभागव्यवसाय प्रमुखश्री. रविश गुप्ता म्हणाले, केप्री लोन्समध्ये आम्ही एमएसएमईजना वित्त सुविधा सहजपणे पुरवत त्यांचा विकास आणि आर्थिक सुबत्तेला चालना देण्यासाठी प्रयत्नशील असतो. कंपनीने नव्याने लाँच केलेली सुवर्ण कर्ज योजना उद्यम आधारधारकांसाठी खास तयार करण्यात आली असून त्यावरून आर्थिक सर्वसमावेशकता वाढवण्याची आणि कर्ज क्षेत्रात नवे बदल करण्याची आमची बांधिलकी दिसून येते. सुरळीत प्रक्रियास्पर्धात्मक व्याजदर आणि परतफेडीचे नाविन्यपूर्ण पर्याय यांसह आम्ही देशभरातील उद्योजकांच्या महत्त्वाकांक्षांना पाठिंबा देण्याची शपथ घेतली आहे.

परतफेडीचे सोपे पर्याय आणि फोरक्लोजर शुल्क नसल्यामुळे ही योजना व्यवसाय चालकांना त्यांच्या व्यावसायिक पेमेंट चक्रानुसार परतफेड करण्याची मुभा देते. त्याशिवाय कर्जाची रक्कम थेट कर्जधारकाच्या खात्यात डिजिटल पद्धतीने हस्तांतरित केली जाते.

केप्री लोन्स नाविन्यपूर्ण वित्त सुविधांच्या मदतीने देशभरातील एमएसएमीजचा विकास आणि यशाला चालना देण्यासाठी बांधील आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight

Racks & Rollers..