‘अ व्हॅलेंटाईन्स डे' ..

 ‘अ व्हॅलेंटाईन्स डे' चित्रपटाच्या टीमचा प्रमोशनसाठी उद्या रत्नागिरी दौरा, चित्रपटाची सोशल मीडियावर चर्चा

- मुंबई सह महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात चित्रपट हाऊसफुल्ल

प्रेम कहाणी सोबतच आदमखोरी दुनियेतील एका भयानक गुन्ह्याचा उलगडा करून देणार या चित्रपटाचं कथानक प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे आकर्षित करतंय. उद्या ‘अ व्हॅलेंटाईन्स डे' चित्रपटाची टीम रत्नागिरी दौरा करणार आहे. रत्नागिरीचे सुपुत्र फैरोज माजगावकर हे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. उद्या सिटी प्राईड रत्नागिरी चित्रपटगृहात संध्याकाळी ७ वाजताच्या शोला रोहितराव नरसिंगे, निर्माते महादेव चाकणकर आणि ऋतिक मालवणकर, फैरोज माजगावकर, आदिन माजगावकर आणि चैताली चव्हाण हे कलाकार हजेरी लावतील. त्यामुळे सिने रसिकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. चित्रपटातील कलाकारांना प्रत्यक्षात भेटण्याची संधी उद्या रत्नागिरीकरांना मिळणार आहे.

गोल्डन स्ट्राईप्स एंटरटेनमेंट एलएलपी, प्रस्तुतकर्ते एम आर जोकर एंटरटेनमेंट एल एल पी सोबत सहयोगी अनिल एन वहाने फिल्म्स प्रोडक्शन्स आणि कियान फिल्म्स & एंटरटेनमेंट या निर्मिती संस्थेचे श्री.फैरोज अनवर माजगावकर, श्री.अमजद हुसैन निराळे, श्री.श्रीकांत सिंह आणि सह निर्माते म्हणून श्री.अनिल वहाने आणि श्री.सुनील यादव ‘अ व्हॅलेंटाईन्स डे' या चित्रपटाचे निर्माते आहेत. साई पियुष,ऍलेन के पी ऊर्फ सिद्धार्थ पवार आणि निरंजन पेडगावकर हे संगीत दिग्दर्शक आहे. तसेच ‘ब्लू लाइन म्यूजिक’ ही म्युझिक पार्टनर कंपनी आहे.

या चित्रपटाच्या निमित्ताने एक वेगळा प्रयत्न आम्ही केला असून हे ‘रहस्य’ प्रेक्षकांना जाणून घ्यायला नक्की आवडेल असा विश्वास दिग्दर्शक रोहितराव नरसिंगे यांनी चित्रपटाच्या प्रीमियर सोहळ्यात बोलताना व्यक्त केला. आणि चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा देखील त्यांनी केली. त्यानंतर या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहेत. मुंबई सह महाराष्ट्रातील पुणे, पनवेल, रत्नागिरी, नाशिक, परभणी, लातूर, उस्मानाबाद, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, औरंगाबाद या जिल्ह्यातील चित्रपटगृह हाऊसफुल्ल होताना दिसत आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight

Racks & Rollers..