विठूरायाच्या शोधात अनिकेत

विठूरायाच्या शोधात अनिकेत

आषाढी एकादशी म्हणजे अवघ्या महाराष्ट्रासाठी एक आनंद सोहळाच... 

पंढरीच्या वारीत वारकरी पांडुरंगाचे नाव घेत मोठ्या श्रद्धेने चालतातत्या प्रवासातच त्यांना पांडुरंग भेटत असावा. अभिनेता अनिकेत विश्वासराव हा मात्र या विठूरायाचा शोध घेतोय. हा शोध तो कशासाठी घेतोय?  हे जाणून घ्यायचं असेल तर रुद्र एंटरटेनमेंट स्टुडिओज् आणि गणराज स्टुडिओज् प्रस्तुत डंकाहरीनामाचा हा  चित्रपट  तुम्हाला पहावा लागेल. हा मराठी चित्रपट १९ जुलैला चित्रपटगृहात दाखल  होतोय. रविंद्र फड निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन श्रेयश जाधव यांनी केले आहे.

 

या चित्रपटाचा टीझर नुकताच समोर आला असून, चला आपण आणू आपल्या विठुरायाला... असं अनिकेत  बोलताना दिसतोय. विठ्ठलाच्या शोधात असतांना अनिकेतच्या हाती काय येतंआणि हा शोध नेमका कुठे संपतो याची उत्सुकता प्रदर्शित झालेल्या टीझर वरून निर्माण झाली आहे.  अनिकेत विश्वासराव सोबत सयाजी शिंदे,  प्रियदर्शन जाधवअविनाश नारकरकिरण गायकवाडरसिका सुनीलअक्षया गुरवनिखिल चव्हाणमयूर पवार,किरण भालेरावकबीर दुहान सिंगमहेश जाधव  या कलाकारांची झलक सुद्धा या  टीझर मध्ये पहायला मिळतेय. 

डंकाहरीनामाचा हा चित्रपट पांडुरंगाच्या निस्सीम भक्तीवर आधारित आहे. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना अनिकेत सांगतोया चित्रपटात मी जना ही व्यक्तिरेखा साकारतोय. भक्तीत लीन होणाराश्रद्धाळूबापासाठीअगदी श्रावणबाळ असलेला जना परंपरागत विठ्ठल मंदिर वाचवण्याचा प्रश्न येतोतेव्हा तो आपलं सर्वस्व पणाला लावतो.  या चित्रपटाच्या निमित्ताने खूप सुंदर अनुभव मला घेता आला. उत्तम दिग्दर्शकसहकलाकार आणि निर्मिती संस्थेसोबत काम करण्याचा आनंद नक्कीच आहे.  १९ जुलैला हा चित्रपट  प्रेक्षकांच्या भेटीला  येतोय.  

निर्माता रविंद्र फड हे स्वतः वारकरी संप्रदायातील असून विठ्ठलाच्या भक्तीपोटी त्यांनी हा चित्रपट विठूरायाला भक्तीभावाने समर्पित केला आहे. कार्यकारी निर्माते ऋषिकेश आव्हाड आहेत. अमोल कागणे फिल्म्सफिल्मास्त्र स्टुडिओजच्या वतीने या चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी फिल्मास्त्र  स्टुडिओजअमेय खोपकर,अमोल कागणेप्रणीत वायकर यांनी सांभाळली आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..