'कलर्स मराठी'ची वारी पंढरीच्या दारी!

'कलर्स मराठी'ची वारी पंढरीच्या दारी; बाळूमामा अन् इंदूसंगे करा विठूमाउलीचा गजर

वारी म्हणजे महाराष्ट्रातील विठ्ठलभक्तांची आनंदयात्रा. आता वारकऱ्यांच्या दिंडीत दंग होण्यासाठी 'कलर्स मराठी'वरील कलाकारदेखील सज्ज झाले आहेत. टाळ-मृदंगाच्या नादात फेर धरत ही कलाकार मंडळी पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. जगतगुरू तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात देहू येथे 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' या मालिकेतील दोन्ही बाळूमामा आणि 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेतील मुख्य अभिनेता अक्षय मुदावडकर वारकऱ्यांच्या मांदियाळीत सहभागी होणार आहेत. तसेच दुमदुमून निघणाऱ्या आळंदी नगरीत माउलींच्या पालखी सोहळ्यात संदीप पाठकसह 'इंद्रायणी' मालिकेची टीम सहभागी होत आहे. कलाकारांच्या या विशेष सहभागामुळे पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांमध्येही एक वेगळाच उत्साह पाहायला मिळेल. 

पाऊले चालती पंढरीची वाट...

'इंद्रायणी' मालिकेत इंदूची भूमिका साकारणारी सांची भोईर, आदूचं पात्र साकारणारा राघव घाडगे आणि व्यंकट महाराजांच्या भूमिकेत दिसणारा स्वानंद बर्वे या बालकलाकारांची निरागसता आणि समजूतदारपणाचं प्रेक्षकांकडून विशेष कौतुक होत असतं. आता 'पाऊले चालती पंढरीची वाट..' म्हणत वारकऱ्यांसोबत हे बालकलाकारही सहभागी होणार आहेत. त्यांच्यासोबत संदीप पाठकचाही सहभाग असेल. 'ज्ञानोबा - तुकारामां..'च्या गजरात 'बाळूमामा' आणि 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेतील कलाकार सहभागी होणार असल्याने वारकऱ्यांचा आनंद द्विगुणित होणार आहे. 

लाखो वारकऱ्यांच्या मुखातून निघणारा 'ज्ञानोबा-तुकाराम'चा अखंड गजर, भाविकांच्या कपाळावर टिळा अन् बुक्क्यावर नाम कोरणारे 'गंध माउली', रस्त्याच्या दुतर्फा काढलेल्या रांगोळ्या अशा भक्तिभावपूर्ण वातावरणात 'कलर्स मराठी'वरील कलाकारांसोबत विठ्ठलनामाच्या गजरात तुम्हीदेखील नक्की सहभागी व्हा..!

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..