गोदरेज..

 गोदरेज अप्लायन्सेसने पायाभूत सुविधांच्या विस्तारासह रिसर्च आणि डेव्हलपमेंट क्षमता केल्या मजबूत 

Men standing in front of a building

Description automatically generated

मुंबई, 12 जून 2024 : गोदरेज ॲण्ड बॉयसचे व्यवसायिक युनिट असलेल्या गोदरेज अप्लायन्सेसने पुण्यातील पिरंगुट येथे रिसर्च आणि डेव्हलपमेंट प्रकल्पाचा विस्तार केला आहेगोदरेज अँड बॉयसचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक जमशेद एन. गोदरेज यांच्या हस्ते रिसर्च आणि डेव्हलपमेंट सेंटर ॲनेक्सीचे उद्घाटन करण्यात आलेब्रँडच्या इनहाऊस डेव्हलपमेंटल आणि टेस्टिंग लॅबच्या सध्याच्या क्षमता दुप्पट करणे हे या धोरणात्मक विस्ताराचे उद्दिष्ट आहेयामुळे कंपनीची कल्पनागुणवत्ता आणि तांत्रिक प्रगती होईल.

43,000 चौरस फूट अतिरिक्त नवीन क्षेत्रासह विस्तारित रिसर्च आणि डेव्हलपमेंट प्रकल्पामुळे ब्रँडला त्यांच्या रिसर्च आणि डेव्हलपमेंट विभागातील मनुष्यबळाची क्षमता दुप्पट करता येईलयासह NABL मान्यताप्राप्त प्रयोगशाळा आणि प्रगत अत्याधुनिक पायाभूत सुविधा विकास प्रक्रिया सक्षम करतातहा विस्तार म्हणजे ग्राहकांना अत्याधुनिक आणि ऊर्जा-कार्यक्षम उत्पादने वितरीत करण्याच्या गोदरेजच्या दीर्घकालीन धोरणाचा एक भाग आहेइमारतीची स्वतःची रचनादेखील वेगळ्या प्रकारे करण्यात आली आहेविजेच्या खर्चात मोठ्या प्रमाणात कपात करण्याच्या उद्देशाने येथे नैसर्गिक प्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करण्यात येत आहेएकत्रित काम करता यावेएकमेकांशी माहितीचे आदान-प्रदान करता यावे अशा रितीने कार्यालयाची रचना करण्यात आली आहेओपन ऑफिस डिझाइन आणि पारदर्शकता असलेला हा प्रकल्प आहे.

यावर भाष्य करताना, गोदरेज आणि बॉयसचा भाग असलेल्या गोदरेज अप्लायन्सेसचे व्यवसाय प्रमुख आणि कार्यकारी उपाध्यक्ष कमल नंदी म्हणाले की"गोदरेज अप्लायन्सेसमध्येउत्पादन विकास हा आमच्या ब्रँडचा कणा आहेयाची आम्हाला जाणीव आहेत्यामुळेआम्ही नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी रिसर्च आणि डेव्हलपमेंटसाठी महत्त्वपूर्ण गुंतवणूक केली असूनती आमच्या आमच्या यशासाठी मोलाची आहेअसे आम्हाला वाटते

या सुधारित रिसर्च आणि डेव्हलपमेंट प्रकल्पामुळे पिरंगुटमध्ये आमचा एकत्रित रिसर्च आणि डेव्हलपमेंट वरील गुंतवणूक खर्च 100 कोटी रु.च्या जवळपास पोहोचला आहेआमच्या ग्राहकांच्या विकसित गरजा पूर्ण करणारी उत्कृष्ट उत्पादने वितरीत करण्यासाठी आमचे समर्पण यातून दिसून येतेया विस्तारासहआम्ही आमच्या उत्पादन विकासाच्या कालमर्यादेला गती देण्यासाठी आणि आगामी काळात बाजारात अधिक प्रगत उपकरणे सादर करण्यास तयार आहोत.”

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..