गोदरेज इंटेरियरच्या ‘होमस्केप्स’

 कोणतं शहर करतं सर्वात जास्त बिंज वॉचगोदरेज इंटेरियरच्या होमस्केप्स’ अहवालात झालं उघड

भारत जून २०, २०२४ – गोदरेज इंटेरियो या गोदरेज अँड बॉयस कंपनीच्या, घरगुती आणि कार्यालयीन वापराचे फर्निचर बनवणाऱ्या आघाडीच्या कंपनीने भारतातील प्रमुख शहरांतले नागरिक घरी कशाप्रकारे आराम करणं पसंत करतात याची खास माहिती शेअर केली आहे. कंपनीने तयार केलेल्या ‘होमस्केप्स’ या सर्वेक्षणात विविध शहरांतील ट्रेंड्स मांडले असून त्यात चेन्नई बिंज- वॉचिंगमध्ये आघाडीवर असल्याचं कळालं आहे.


या अहवालात सहभागी झालेले चेन्नईतील ५० टक्के नागरिक स्वतःला ‘सीरियल बिंज वॉचर’ म्हणवतात. ते कायमच पुढच्या मल्टी- एपिसोड सीरीजच्या शोधात असतात. स्ट्रीमिंग कंटेंटची आवड २०१४ मधल्या अहवालातही अधोरेखित झाली होती. या अहवालातही चेन्नचं टीव्हीवेड आणि इथले नागरिका इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत जास्त टीव्ही पाहात असल्याचं उघड झालं होतं. त्यांच्यासाठी बिंज वॉचिंग मॅरेथॉन्ससाठी घर ही सगळ्यात आदर्श जागा असून, तिथे एकाच बैठकीत १० एपिसोड्स पाहाणं अगदी सामान्य आहे. या सर्वेक्षणात असंही दिसून आलं, की ७१ टक्के चेन्नईआइट्स ‘मूव्ही नाइट’ मिस करत असून ही परंपरा पुढच्या पिढीमध्ये रूजवण्यासाठी ते उत्सुक आहेत.


गोदरेज इंटेरियोचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख स्वप्नील नगरकर म्हणाले, ‘होमस्केप्स या सर्वेक्षणात आपलं कुटुंब आणि घरासोबतचं सखोल भावनिक नातं ठळकपणे मांडण्यात आलं आहे. होमस्केप्स सर्वेक्षणानुसार घरी निवांत वेळ कसा घालवायचा याच्या व्याख्या गेल्या काही वर्षांत बदलल्या आहेत. या सर्वेक्षणात भारतातील विविध शहरांतील नागरिकांचा बिंज वॉचिंगचा पॅटर्न अधोरेखित करण्यात आला आहे. ग्राहकांची बदलती मानसिकता लक्षात घेऊन गोदरेज इंटेरियोमध्ये आम्ही आरामदायी आणि कार्यक्षम जागा तयार करून बदलत्या सवयी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. ग्राहकांसाठी त्यांचं घर मनोरंजन आणि आराम करण्याचं मुख्य स्थान असेल याची आम्ही काळजी घेतो. कार्यक्षमपणासाठी असलेली बांधिलकी सौंदर्याच्या पलीकडे जाणारी आहे. गोदरेज इंटेरियोला आधुनिक भारतीय जीवनशैलीला साजेशा वैशिष्ट्यांचा समावेश असलेलं फर्निचर तयार करण्याचा अभिमान वाटतो. आमचे फर्निचर घर आणि जीवनशैलीचा महत्त्वाचा भाग बनणारे, स्टाइल तसेच व्यवहार्यता यांचे प्रतीक आहे. या ज्ञानामुळे आम्हाला ग्राहकांच्या आधुनिक जीवनशैलीला साजेसे फर्निचर तयार करणे शक्य होते.’


त्याशिवाय या सर्वेक्षणानुसार बिंज वॉचमध्ये हैद्राबाद दुसऱ्या स्थानावर असून सर्वेक्षणात सहभागी झालेल्या तिथल्या ३४ टक्के नागरिकांनी आपण घरी बिंज वॉच करत असल्याचे सांगितले, तर ७० टक्के नागरिकांनी ‘मूव्ही नाइट’ची परंपरा परत सुरू झाली पाहिजे असं सांगितलं. चेन्नई आणि हैद्राबादच्या तुलनेत मुंबईमध्ये वेगळा पॅटर्न पाहायला मिळाला. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या तिथल्या अर्ध्यापेक्षा कमी जणांनी (४७ टक्के) ‘मूव्ही नाइट्स’ महत्त्वाची असून ही परंपरा परत सुरू झाली पाहिजे असं मत व्यक्त केलं, मात्र तिथल्या केवळ १२ टक्के जणांनी आपण बिंज- वॉचर्स असल्याचं सांगितलं. त्याविरोधात लखनौमधील सहभागींपैकी फक्त २० टक्के जणांनी ‘मूव्ही नाइट्स’ सुरू झाली पाहिजे असं सांगितलं, तर २८ टक्के जणांनी आपण बिंज- वॉचर्स असल्याचं सांगत वेगवेगळ्या शहरातील मनोरंजनाची आवड वेगळी असल्याचे अधोरेखित केले.


हे सर्वेक्षण बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैद्राबाद, कोलकाता, मुंबई आणि लखनौ या सात शहरांतील २८२२ भारतीयांशी बोलून तयार करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

The Federation of Obstetric & Gynaecological Societies of India..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight