'सारं काही तिच्यासाठी' दररोज रात्री ८: ३० वा फक्त आपल्या झी मराठीवर

 निशी आणि श्रीनूच्या आयुष्यात आलेलं वादळ काय- काय उध्वस्त करेल?

'सारं काही तिच्यासाठी' मध्ये  मेघना आणि चारूचे रचलेले कट यशस्वी होत आहेत. चारू श्रीनूला आपल्या जाळ्यात फसवण्यात यशस्वी झाली आहे. ती श्रीनू समोर रडून त्याच्या मनामध्ये अपराधीपणाची भावना निर्माण करते. श्रीनू सोबत हे सगळं होत असतानां तिथे निशीची परिस्थिती देखील अवघड होत चालली आहे. निशी अचानक खोत घरात परत येते. ती घाबरलेल्या अवस्थेत आहे तिला कशाचंही भान नाहीये, ती उमा आणि ओवीला सोडून कोणाला ही ओळखत नाहीये. तिची अवस्था पाहून सगळे हादरतात. मेघना तिच्या मागोमाग येते आणि सर्वाना सांगते की निशी  गरोदर आहे  पण तिला स्वत:च्या बाळाची  नीट काळजी सुद्दा घेता येत नाहीये . मी काही सांगितलं तर माझ्या अंगावर धावून येते.  हे सगळं करत असताना मेघना चारुवर एक जबाबदारी सोपवते निशीचं मिस कॅरेज होईल असं परिस्थिती निर्माण कर.  निशीची अवस्था पाहून उमा कणखर बनते आणि रघुनाथला पण भानावर आणते. एकुलती एक मुलगी आज दु:खात आहे, त्यामुळे आपल्याला तिला  सावरावं लागेल. तुम्हीच तिला लग्नाच्या वेळी वचन दिलं होतं की तुम्ही आयुष्यभर तिच्या पाठीशी उभे राहाल आता ते वचन  पाळायची वेळ आली आहे.

आता काय होईल जेव्हा मेघना आणि चारुचं हा प्लान उमा आणि रघुनाथच्या समोर येईल? निशी आणि श्रीनुच्या आयुष्यात आलेलं वादळ काय काय उध्वस्त करेल? हे जाणून  घेण्यासाठी पाहायला विसरू नका 'सारं काही तिच्यासाठी' दररोज रात्री ८: ३०  वा फक्त आपल्या झी मराठीवर

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

BlueStone Jewellery & Lifestyle IPO

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025