मॅग्निफ्लेक्स इंडिया तर्फे मॅग्निजिओ ची सुरुवात
शाश्वत विकासाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकत मॅग्निफ्लेक्स इंडिया तर्फे मॅग्निजिओ ची सुरुवात
~ नवीन पर्यावरणस्नेही तंत्रज्ञानामुळे पर्यावरणावर कमी परिणाम करत आरामदायक झोप देण्यासाठी क्रांतिकारी बदल ~
मुंबई - ५ जून २०२४- जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मॅग्निफ्लेक्स या लक्झरी मॅट्रेस ब्रॅन्ड तर्फे आज मॅग्निजिओ या नवीन मॅट्रेसेसची सुरुवात करत असल्याची घोषणा केली. या मॅट्रेसेस सर्वोत्कृष्ट आराम देणार्या तर आहेतच पण त्याच बरोबर शाश्वत पर्यावरणाचीही हमी देतात. जागतिक स्तरावरील वाढते तापमान आणि पर्यावरणाचा होणारा त्रास पाहता असे दिसून येते की आपली पृथ्वी ही मोठ्या संकटाच्या तोंडावर उभी आहे. मॅग्निजिओ ची सुरुवात करुन मॅग्निफ्लेक्स इंडिया ने आता शाश्वत भविष्याकडे आपला प्रवास सुरु केला आहे. मॅग्निफ्लेक्स ने अशी योजना आखली आहे की प्रत्येक मॅग्निजिओ च्या खरेदी नंतर ग्राहकांच्या वतीने एक झाड लावण्यात येणार असून त्याचे प्रमाणपत्र हे त्यांच्या किंवा त्यांच्या वारसदाराच्या नावे देण्यात येणार आहे.
या नवीनतम उत्पादना विषयी माहिती देतांना मॅग्निफ्लेक्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आनंद निचानी यांनी सांगितले “ हवामान बद्दल ही गोष्ट भविष्यातील राहिली नसून ते आता मोठे सत्य बनले आहे, परिणामी आपल्या आवडींचा पुर्नविचार करुन शाश्वत जीवनशैलीचा अवलंब करणे आवश्यक बनले आहे. लोकांमधील वाढती जागरुकता लक्षात घेऊन आणि ग्राहकांची आवड लक्षात घेऊन आता लोक अशी उत्पादने घेत आहेत ज्यामुळे पर्यावरणस्नेही मुल्यांनाही जपता येऊ शकेल. आम्ही असे उत्पादन आणले आहे की ज्यामुळे केवळ आरामच मिळणार नाही तर त्याच बरोबर पर्यावरणाची जबाबदारीही पूर्ण करता येऊ शकेल. शाश्वत भविष्यासाठी आवश्यक असलेल्या आणि यूएन ने घालून दिलेल्या १७ सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स वर अंमलबजावणी करण्याचे आम्ही ठरवले आहे. मॅग्निजिओ हे सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेल्या प्रयत्नांमधील आमचे योगदान आहे.”
मॅग्निजिओ मॅट्रेसेसची निर्मिती ही रिजनरेटेड फोमचा वापर करुन केलेली आहे, यामध्ये कोणत्याही प्रकारच्या घातक एक्स्पान्डिंग एजंट्सचा वापर केलेला नाही. यामुळे पाठीच्या कण्याला आराम मिळण्यास मदत हेऊन मेमोफोम पॅडिंग मुळे शरीराचा आकार सुस्थितीत राहतो. यातील ब्रीदेबल फायबर्स मुळे आराम वाढून, यातील ‘नो वेस्ट’ फ्रॅब्रिक मुळे मुलामयमपणा टिकून राहतो.
मॅग्निजिओ च्या पर्यावरणस्नेही आणि सामाजिक जबाबदारी ही ओएको- टेक्स स्टॅन्डर्ड १०० आणि ओएको-टेक्स स्टेप प्रमाणानाने युक्त असल्यामुळे यांत कोणताही घातक पदार्थ नाही आणि जबाबदारी उत्पादन प्रक्रिया असल्याचे यातून अधोरेखित होते. या व्यतिरिक्त कंपनीच्या नाविन्यपूर्ण व्हॅक्युम पॅकिंग तंत्रज्ञाना मुळे वाहतूकीतून निर्माण होणारा धूरही कमी होतो, त्याच बरोबर विशेष अशा संशोधन आणि विकासामुळे उत्पादनाची क्षमता वाढून हे उत्पादन किमान १० वर्षांच्या जीवनमानाने युक्त होते. परिणामी घटकांचीही बचत होते.
मॅग्निजिओ मॅट्रेसेस ही मॅग्निफ्लेक्सच्या सर्व स्टोअर्स आणि वेबसाईटवर उपलब्ध आहेत. ग्राहकांना आता मॅग्निफ्लेक्स इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एमआयपी) चा वापर करुन अजोड असा ईएमआयचा पर्याय ही उपलब्ध करण्यात आला आहे. यामुळे आता ग्राहकांना मॅग्निजिओ मॅट्रेस विकत घेणे अधिक सोपे होणार आहे.
Comments
Post a Comment