महालक्ष्मी सरस..
महालक्ष्मी सरस मध्ये अहिल्यानगरच्या मंगला वाकचौरे यांची कमाल; मडक्यातील लोणचं ४ दिवसांत ४० किलो विक्री, १,००० रुपये किलो दर मुंबई, ०५ मे २०२६, मुंबई : उमेद अभियानाच्या माध्यमातून आयोजित महालक्ष्मी सरस २०२६ मध्ये राज्यभरातून आलेल्या महिला उद्योजकांनी आपल्या व्यवसाय, हस्तकला आणि खाद्यपदार्थांद्वारे वेगळी ओळख निर्माण केली आहे. या मेळ्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी गावच्या मंगला संजीव वाकचौरे (वय ४० वर्षे) यांनी मडक्यातील पारंपरिक लोणच्यांमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. २ मे पासून सुरू झालेल्या या मेळ्यात अवघ्या चार दिवसांत मंगला वाकचौरे यांनी ४० किलो लोणचं प्रति किलो १,००० रुपयांच्या दराने विक्री केली आहे. साडेचारशेहून अधिक स्टॉल्समधून त्यांच्या लोणच्यांचा स्टॉल हा सर्वाधिक महागड्या आणि तितकाच लोकप्रिय स्टॉल म्हणून ओळखला जात आहे. मंगला वाकचौरे या गेली १० ते १५ वर्षे घरगुती पद्धतीने लोणचं बनवत होत्या, तर सुमारे अडीच वर्षांपासून त्यांनी याला व्यवसायाचे स्वरूप दिले. उमेद अभियानात सहभागी झाल्यानंतर त्यांना व्यवसाय वाढवण्याची दिशा मिळाली. या माध्यमातून त्यांना...