'स्वरगंधर्व सुधीर फडके' चित्रपटाच्या निमित्ताने 'गीतरामायण'च्या आठवणींना उजाळा
'स्वरगंधर्व सुधीर फडके' चित्रपटाच्या निमित्ताने 'गीतरामायण'च्या आठवणींना उजाळा संगीतविश्वातील एक मोठे नाव म्हणजे सुधीर फडके. स्वरगंधर्व सुधीर फडके म्हणजेच 'बाबूजी' यांच्या 'गीतरामायण' या अद्भुत निर्मितीस ६९ वर्षे पूर्ण झाली असून या ऐतिहासिक दिवसाचं औचित्य साधत रिडिफाईन प्रॉडक्शन्सने पुण्यात 'स्वरगंधर्व सुधीर फडके' या चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग म्हणून एका अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात श्रीधर फडके, आनंद माडगुळकर ही सुधीर फडके, ग. दि. माडगुळकर यांची पुढील पिढी, आकाशवाणी पुणे केंद्राच्या काही सन्माननीय व्यक्ती, 'स्वरगंधर्व सुधीर फडके' चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते सौरभ गाडगीळ, लेखक, दिग्दर्शक, निर्माते योगेश देशपांडे, कलाकार सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे, सागर तळाशीकर, मिलिंद फाटक, आदिश वैद्य, सुखदा खांडकेकर, अपूर्वा मोडक, अविनाश नारकर, धीरेश जोशी, परितोष प्रधान उपस्थित होते. यावेळी या मान्यवरांसोबत गप्पांची मैफलही रंगली. या कार्यक्रमादरम्यान 'स्वरगंधर्व सुधीर फडके' या चित्रपटाच्या २० फूट उंच अशा भव्य पोस्टरचे अनावर