‘सरसेनापती हंबीरराव’ यांचा १८ फुटी कटआऊट

पुण्यात उभारला ‘ सरसेनापती हंबीरराव ’ यांचा कटआऊट सुप्रसिद्ध लेखक , दिग्दर्शक , अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे यांच्या ‘ सरसेनापती हंबीरराव ’ या महाराष्ट्राच्या महासिनेमाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे . या चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रातील हितचिंतक , चाहते आणि रसिक प्रेक्षक विविध प्रकारे शुभेच्छा देत आहेत . पुण्यामध्ये माजी उपमहापौर आणि विद्यमान नगरसेवक मा . दीपक माधवराव मानकर तसेच करण मानकर , दत्ताभाऊ सागरे आणि आनंद सागरे यांनी ‘ सरसेनापती हंबीरराव ’ या महाराष्ट्राच्या महासिनेमाला शुभेच्छा देण्यासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळ सरसेनापती हंबीरराव यांचा १८ फूट उंच कटआऊट उभा केला आहे . त्यानिमित्त या मान्यवरांनी खूप मोठा स्वागत सोहळा आयोजित केला होता . खास काढलेली रांगोळी , सजावट आणि ढोलताश्यांच्या गजरात मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या सोहळ्याला चित्रपटाचे लेखक , दिग्दर्शक , अभिनेते