रंगभूमीवर 'नथुराम' विरुध्द 'नथुराम'!
रंगभूमीवर 'नथुराम' विरुध्द 'नथुराम'! • शरद पोंक्षेंनी शिर्षक पळविल्याचा निर्माते उदय धुरत यांचा आरोप!! • मराठी रंगभूमीच्या इतिहासात गेल्या १५० वर्षात घडले नाही असे 'मी नथुराम गोडसे बोलतोय' च्या अभिनेत्याचे कृत्य! - निर्माते उदय धुरत (माऊली प्रॉडक्शन) मुंबई : मराठी रंगभूमीच्या इतिहासात गेल्या १५० वर्षात घडले नाही असे कृत्य 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या बहुचर्चित मराठी नाटकाच्या निमित्ताने घडत आहे, शीर्षकासह या नाटकाची संहिताच ढापण्याचा हा प्रकार घृणास्पद व निंदनीय आहे. प्रचंड मेहनत घेऊन, संशोधन करून दिवंगत जेष्ठ लेखक प्रदीप दळवी यांनी लिहिलेल्या 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकाच्या लिखाणाचे व शीर्षकाचे श्रेय या नाटकाद्वारे अभिनेता म्हणून नावलौकिक मिळविणाऱ्या व्यक्तीनेच(शरद पोंक्षे यांचे नाव घेण्याची इच्छा नसल्याचे सांगत ) करावे हे मराठी रंगभूमीसाठी शोभनीय नाही. यामुळे चुकीचा पायंडा पडला जाईल आणि अनेक प्रतिभावंत नाटककारांचे श्रेय लाटण्याची परंपरा सुरु होईल अशी खंत निर्माते उदय धुरत व्यक्त करतात. काही वर्षांपूर्वी मराठी रंगभूमीवर प्रचं