२७ ऑक्टोबरला'सिंगल'करणार धमाल

२७ ऑक्टोबरला'सिंगल'करणार धमाल

आजकाल कोणी 'एकटंअसलं की,  लोकांच्या भुवया लगेच उंचावतात. लग्न झालंय की नाहीसिंगल की कमिटेडअशा प्रश्नांचा भडिमार सुरु होतो. आणि जर या दोन्ही प्रश्नांची उत्तर नकारार्थीअसतील तर  विचारूच नका..!! अशा सिंगल  असलेल्यांच नेमकं काय होतं?  त्यांना कोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतंहे दाखवणारा सिंगल हा धमाल मराठी चित्रपट २७ ऑक्टोबरला आपल्या भेटीला येतोय. या  चित्रपटाचं एक आकर्षक पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालंयं. पोस्टर मध्ये एक लालचुटूक हृदय पहायला मिळतंय. ते कोणाचं आहेत्याचं काय म्हणणं आहे ?  हे जाणून घेण्यासाठी दिग्दर्शक चेतन चावडा आणि सागर पाठक यांचा सिंगल हा चित्रपट आपल्याला पहावा लागेल. चित्रपटातील कलाकारांची नावे गुलदस्त्यात असल्यामुळे चित्रपटात कोण कलाकार असणार? याची उत्सुकता ही लागून राहिली आहे. 

तरुण प्रेक्षकांच्या निखळ मनोरंजनासाठी आम्ही सिंगल हा चित्रपट आणला आहे. सिंगल असलेल्या आणि नसलेल्या प्रत्येकाला हा चित्रपट धमाल अनुभव देईल, असा विश्वास दिग्दर्शक व्यक्त करतात.

किरण काशिनाथ कुमावतहर्षवर्धन गायकवाडशरद पाटील, अमोल कागणेगौरी सागर पाठक, सिंगल हे या चित्रपटाचे निर्माते असून सह-निर्माते सुमित कदम आहेत. चित्रपटाचं लेखन सतीश समुद्रे यांचे असून पटकथा चेतन चावडा, सागर पाठक आणि सतीश समुद्रे  यांची आहे. अभिजीत कवठाळकर,  मोहित कुलकर्णी यांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे. छायांकन अमोल गोळे यांचे आहे. वितरणाची जबाबदारी फिल्मास्त्र स्टुडिओजने सांभाळली आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

Racks & Rollers..