मनोरमाच्या रहस्याचा गुंता सोडवण्यासाठी नेत्रा काय करेल?
मनोरमाच्या रहस्याचा गुंता सोडवण्यासाठी नेत्रा काय करेल?
सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत सध्या मनोरमाच्या रहस्याने प्रेक्षकांची उत्कंठा वाढवून ठेवली आहे. नुकतंच मालिकेत हे दाखवण्यात आलं की नेत्राला कळतं, इंद्राणीला त्रिनयना देवीचं वरदान आहे आणि इंद्राणीच मनोरमाची मुलगी आहे. त्यामुळे नेत्राला इंद्राणीविषययी सहानुभूती वाटू लागते. इंद्राणी या घरात का आलीय, तिचा हेतू काय याबद्दल नेत्राला ज्या गोष्टी कळू लागतात त्याबद्दल नेत्रा अव्दैतलाही सांगून विश्वासात घेते. मालिकेत आतापर्यंत मनोरमा गाव सोडून जाते, इथपर्यंतची गोष्ट प्रेक्षकांनी पाहिली आहे. आता मालिकेत मनोरमा गाव सोडून गेल्यानंतर तिच्या आयुष्यात काय घडलं, हे पहायला मिळणार आहे. इंद्राणी राजाध्यक्षांच्याच घरात राहून तिचा बदला घेण्यात यशस्वी होईल का, मनोरमाच्या बाबतीत नेमकं काय घडलं, या रहस्याची दुसरी बाजू नेत्राला कळणार का, पद्माकर आजोबा त्यांनी केलेलं गंभीर पाप कबूल करतील का, मनोरमाच्या रहस्याचा गुंता सोडवण्यासाठी नेत्रा काय करेल? हे या आठवड्यात सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.
"सातव्या मुलीची सातवी मुलगी" सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.
Comments
Post a Comment