येत्या दिवाळीत तुम्हा सगळ्यांना भेटायला येत आहे खोडकर श्याम आणि त्याला मायेने शिस्त लावणारी 'श्यामची आई'

येत्या दिवाळीत तुम्हा सगळ्यांना भेटायला येत आहे.. खोडकर श्याम आणि त्याला मायेने शिस्त लावणारी 'श्यामची आई' 

         नव्या पोस्टरने वेधलं लक्ष

राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक सुजय सुनील डहाके दिग्दर्शित 'श्यामची आई' या चित्रपटाच्या नव्या पोस्टरचं नुकतंच अनावरण करण्यात आलं. बहुचर्चित 'श्यामची आई' या चित्रपटाची निर्मिती अमृता अरुण राव यांची आहे . तर सुपरहिट 'पावनखिंड' चित्रपटाचे निर्माते  भाऊसाहेब , अजय , अनिरुद्ध आरेकर , आकाश पेंढारकर आणि विक्रम धाकतोडे हे प्रस्तुतकर्ता आहेत. यंदा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर 'श्यामची आई' हा चित्रपट आपल्या भेटीस येत आहे.

अमृता फिल्म्स निर्मित आणि आलमंड्स क्रिएशन प्रस्तुत 'श्यामची आई' या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच जोरदार चर्चा सुरु आहे. साने गुरुजी यांच्या कादंबरीवर आधारित 'श्यामची आई' या चित्रपटाची संहिता प्रसिद्ध लेखक -दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांची आहे.

'श्यामची आई' या चित्रपटात ओम भूतकर यांनी साने गुरुजींची मध्यवर्ती भूमिका साकारली आहे तर सोबत गौरी देशपांडे, बाल कलाकार शर्व गाडगीळ,संदीप पाठक, ज्योती चांदेकर, 

सारंग साठ्ये,मयूर मोरे,उर्मिला जगताप,भूषण विकास,सुनिल अभ्यंकर , अक्षया गुराव अशी मोठी स्टारकास्ट पहायला मिळणार आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

World & Olympic Champion Beatrice Chebet to headline Inaugural SFC Global 10K